शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

कोण होणार राष्ट्रपती?

By admin | Updated: June 1, 2017 01:18 IST

रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी

सुरेश भटेवरा/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रायसीना हिलवर राष्ट्रपती भवनात यंदा कोण पोहोचणार? जुलै महिन्यात होऊ घातलेली निवडणूक एकमताने होणार की सत्ताधारी आणि विरोधक आपापले बळ अजमावण्यासाठी मतदान घडवणार? याबाबत स्थिती अद्याप स्पष्ट नाही. भारताचे १४ वे राष्ट्रपती ऐंशीच्या दशकानंतर प्रथमच अशा स्थितीत निवडले जाणार आहेत की एकूण मतदानाच्या ४0 टक्के हमखास मते सत्ताधारी एनडीएकडे आहेत. साहजिकच राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार विराजमान करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि एनडीए विजयाच्या निकट आहेत.मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीएकडे ३३८ खासदार व १३५२ आमदारांचे संख्याबळ आहे. त्यांच्या मतमूल्याची बेरीज आजमितीला ५ लाख ३२ हजार 0३६ आहे. तरीही बहुमतासाठी सत्ताधारी आघाडीला आणखी १७ हजार ४0४ मतांची आवश्यकता आहेच.एनडीएच्या साऱ्या मतदारांना एकत्र ठेवून आणखी एकदोन गैर काँग्रेस पक्षांना आपल्याकडे ओढण्यात मोदी यशस्वी ठरले तर राष्ट्रपतीपदावर आपल्या पसंतीचा उमेदवार निवडून आणण्यात त्यांना फारसा त्रास होणार नाही. तथापि एनडीएतील शिवसेना, अकाली दल, तेलुगु देशम यासारख्या पक्षांनी ऐनवेळी वेगळी भूमिका घेतली तर सध्याच्या गणितात बराच फरक पडू शकतो. आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेस, तेलंगणातील टीआरएस, दिल्लीतील आप, तामिळनाडूतील अद्रमुक व ओडिशात बीजेडी हे पक्ष आजमितीला एनडीए अथवा यूपीए यापैकी कोणत्याही आघाडीचे घटक पक्ष नाहीत.या ६ पक्षांकडे १४ टक्के मते आहेत. यापैकी एक-दोन पक्षांची मते वळवण्यात जरी मोदींना यश आले, तर पारडे एनडीए उमेदवाराच्या दिशेने झुकू शकते. याउलट विपरित स्थितीत विरोधकांना जर चमकदार कामगिरी करून दाखवण्यासाठी सर्व गैरभाजप मतदारांना एकत्र ठेवून त्यांची मते आपल्या उमेदवाराच्या पारड्यात त्यांना सर्वशक्तिनिशी ओढावीलागतील. ही शक्यता अर्थातच फार धूसर आहे, याचे कारण अद्रमुक व वायएसआर काँग्रेसने एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्याचे संकेत यापूर्वीच दिले आहेत.... तर सर्वसंमतीने होऊ शकते निवडराष्ट्रपतीपदाचे उमेदवार कोण यावरही हा खेळ बऱ्यापैकी अवलंबून आहे. एखादे असे नाव अचानक पुढे आले तर दोन्ही आघाड्यातील अंतर्विरोधही स्पष्टपणे सामोरे येतील आणि सारी समीकरणेही बदलू शकतील. ज्या नावाला विरोध करणे बहुतांश विरोधकांना अशक्य होईल, असे नाव पुढे करण्यात जर एनडीएने पुढाकार घेतला तर सर्वसंमतीने राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडू शकते. वाजपेयींच्या काळात असे घडले आहे.डॉ. अब्दुल कलाम यांची निवड बिनविरोध झाली नसली तरी डावे पक्ष वगळता, देशातील सर्व राजकीय पक्षांनी कलाम यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला होता.राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यंदा संसदेच्या दोन्ही सभागृहांत ७७६ खासदार व सर्व राज्यांतील मिळून ४१२0 आमदार मतदान करणार आहेत. आमदार, खासदारांचे मिळून मतदानाचे जे निर्वाचक मंडळ (इलेक्टोरल कॉलेज) तयार करण्यात आले आहे, त्याचे एकूण मतमूल्य १0,९८,८८२ इतके आहे.देशातील सर्व आमदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४७४ इतकी आहे. तर ७७६ खासदारांच्या मतमूल्याची बेरीज ५ लाख ४९ हजार ४0८ आहे. राष्ट्रपतीपदावर निवडून येण्यासाठी यापैकी किमान ५ लाख ४९ हजार ४४१ मतांची आवश्यकता आहे.