शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

गुजरातचे नवे मुख्यमंत्री कोण?

By admin | Updated: August 3, 2016 06:10 IST

गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी पद सोडण्याची घोषणा केल्यानंतर नवे मुख्यमंत्री कोण असतील याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत. ज्या प्रमुख नेत्यांची नावे चर्चेत आहेत, त्यात आरोग्यमंत्री नितीन पटेल, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विजय रूपानी, केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला आणि विधानसभाध्यक्ष गणपत वसावा यांच्या नावांचा समावेश आहे. दावेदार नितीन पटेल यांना याबाबत विचारता ते म्हणाले की, केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो सर्वांना मान्य असेल. पक्षाने जबाबदारी दिल्यास आपण ती स्वीकारू असे रूपानी यांनी सांगितले. नव्या मुख्यमंत्र्यांना २०१७च्या निवडणुकीपर्यंत एक वर्षाहून अधिक कार्यकाळ मिळणार आहे. राज्यात मोदी यांच्या कार्यकाळानंतर प्रथमच पक्षाला विरोधी पक्षांकडून कडवे आव्हान मिळत आहे. डिसेंबर २०१५मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ग्रामीण भागात काँग्रेसला चांगले यश मिळाले, तर पटेल आंदोलनाचाही आनंदीबेन यांना सामना करावा लागला. उना येथील घटनेनंतर दलितांचे आंदोलनही सुरू झाले. पक्षाच्या प्रतिमेला त्यामुळे तडा गेला. आनंदीबेन यांची मुलगी अनार पटेलविरुद्ध काँग्रेसने भ्रष्टाचाराचे आरोप केले. या सर्व प्रकारांमुळे आनंदीबेन यांच्या अडचणीत वाढ होत गेली. (वृत्तसंस्था)>मीठ चोळू नकाकाँगे्रसचे गुजरात विभागाचे महासचिव गुरुदास कामत यांनी म्हटले आहे की, जर आनंदीबेन यांना कोणत्याही राज्याचे राज्यपाल केले गेले किंवा केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी करून घेतले, तर दलित आणि पाटीदार समुदायाच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखे होईल. >आनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवलेआनंदीबेन यांना ‘बळीचा बकरा’ बनवून भाजपा स्वत:ला राज्यात वाचवू शकत नाही. कारण, गुजरातची जी हानी, दुरवस्था झाली आहे त्यासाठी नरेंद्र मोदी यांचे १३ वर्षांतील सरकार जबाबदार आहे, अशी टीका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. आनंदीबेन पटेल यांनी पदावरून दूर होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी याबाबत टिष्ट्वट केले आहे. ते म्हणाले की, गुजरातच्या दुरवस्थेसाठी आनंदीबेन यांचे दोन वर्षांचे सरकार नव्हे, तर मोदींचे १३ वर्षांचे सरकार जबाबदार आहे.