नवी दिल्ली : देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी विकिपीडियातील पानात खोडसाळपणा कुणी केला? त्यासाठी नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर(एनआयसी) संगणकीय यंत्रणेचा वापर झाला काय? याची उत्तरे या सरकारी सॉप्टवेअर संस्थेने देण्यास नकार दिला आहे. सुरक्षात्मक बंधनांचे कारण त्यासाठी देण्यात आले.आरटीआयच्या पारदर्शकता कायद्यांतर्गत एखादी माहिती रोखून ठेवण्याची सवलत मिळाली काय, याचे कोणतेही स्पष्टीकरण या संस्थेने दिले नाही. कॉम्प्युटर इमर्जन्सी रिसपॉन्स टीम- इनने(सीईआरटी) दिलेल्या उत्तराचा आधार घेण्यात आला. त्याबाबत माहिती उघड करता न येण्याचे कारण सुरक्षेसंबंधी बंधनेच असल्याचे संकेत या संस्थेचे अधिकारी स्वरूप दत्ता यांनी दिलेल्या उत्तरातून मिळाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)
नेहरूंचे पान कुणी बदलले?
By admin | Updated: August 9, 2015 22:28 IST