शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कोण आहेत स्वामीनाथन?

By admin | Updated: June 11, 2017 04:07 IST

हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २00४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना केली.

हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन सरकारने १८ नोव्हेंबर २00४ रोजी राष्ट्रीय कृषक आयोगाची स्थापना केली. शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी या आयोगाची रचना करण्यात आली. आयोगाने २00६ पर्यंत एकूण पाच अहवाल सादर केले. अंतिम अहवाल ४ आॅक्टोबर २00६ रोजी सादर केला आणि शेतकऱ्यांच्या दुरवस्थेची कारणे व त्यावरील उपाय सुचविले. खेदाची बाब म्हणजे, त्याच्या दुसऱ्या दिवशी ५ आॅक्टोबर रोजी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सहावा वेतन आयोग स्थापन केला. त्याच्या शिफारशीही २00८ मध्ये लागू केल्या. यात भर म्हणजे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीही लागू करण्याच्या तयारीत सध्या सरकार आहे. मात्र, अंतिम अहवाल सादर करून जवळपास अकरा वर्षे होत आली तरीही स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी थंड बस्त्यात टाकून देण्यात आल्या आहेत.

या अहवालातील काही प्रमुख शिफारशी अशा...- शेतकऱ्यांचे खर्च वजा जाऊन उत्पन्न सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे असावे.- शेतमालाचा हमीभाव उत्पादन खर्च वगळता ५0 टक्के असावा.- शेतमालाची आधारभूत किंमत लागू करण्याची पद्धत सुधारुन गहू आणि इतर खाद्यान्न वगळता इतर पिकांना आधारभूत किंमत मिळायची व्यवस्था करावी. - बाजाराच्या चढ-उतारापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे म्हणून मूल्य स्थिरता निधीची स्थापना करावी.- आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीच्या दुष्परिणामापासून शेतकऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी इतर देशांमधून येणाऱ्या शेतमालाला आयात कर लावावा.- दुष्काळ व इतर आपत्तीपासून बचावासाठी कृषी आपत्कालीन निधीची स्थापना करावी.- कृषी पतपुरवठा प्रणालीचा विस्तार करावा.- पीक कर्जावरील व्याजाचा दर कमी करावा.- हलाखीची स्थिती असलेल्या क्षेत्रामध्ये नैसर्गिक आपत्तीवेळी, पूर्वस्थिती येईपर्यंंत कर्जासहित सर्व कर्जाची वसुली स्थगित करून त्यावरील व्याज माफ करावे.- संपूर्ण देशातील सर्व पिकांना कमीत कमी हप्त्यावर विमा संरक्षण मिळेल. अशा रीतीने पीक विमा योजनेचा विस्तार व ग्रामीण विमा विकास निधीची स्थापना करावी.- पिकांच्या नुकसानीचे मूल्यमापन करत असताना ब्लॉकच्या ऐवजी गाव घटक वापरुन विमा संरक्षण द्यावे.- सामाजिक सुरक्षेचे जाळे निर्माण करून त्याअंतर्गत शेतकऱ्यांसाठी वृद्धावस्थेत आधार तसेच स्वास्थ्य विम्याची तरतूद करावी.- परवडणाऱ्या दरात बि-बियाणे व इतर यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी.- संपूर्ण देशात प्रगत शेती व माती परीक्षण प्रयोगशाळेचे संचालन- शेतीला कायम, सम प्रमाणात सिंचन, वीजपुरवठा आणि सिंचन व्यवस्थेत आमूलाग्र सुधारणा घडवून आणाव्यात.राष्ट्रीय समितीमधील सहभागराष्ट्रीय जैवतंत्रज्ञान महामंडळाचे अध्यक्ष, भारत सरकारच्या विज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष, नियोजन आयोगाच्या पर्यावरण व विकास समितीचे अध्यक्ष, केंद्रीय भूजल महामंडळाच्या पुनरावलोकनासाठी उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय लोकसंख्या धोरण मसुदा समितीच्या तज्ज्ञ गटाचे अध्यक्ष, जागतिक व्यापार कराराच्या संदर्भात शेतमाल निर्यातीसाठी संशोधन समितीचे अध्यक्ष, प्रादेशिक असंतुलन दूर करण्यासाठी केंद्रीय समितीचे अध्यक्ष, कृषी शिक्षणाच्या पुनर्रचना समितीचे अध्यक्ष, राष्ट्रीय जैवविविधता कायदा मसुदा समितीचे अध्यक्ष यासह आठ विविध समित्यांमध्ये सहभाग. आंतरराष्ट्रीय समित्यांमध्ये सहभागसंयुक्त राष्ट्रसंघाच्या विज्ञान व तंत्रज्ञान सल्लागार समितीचे अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मधमाशी संशोधन संस्थेचे अध्यक्ष यासह पाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील समितीमध्ये सहभाग.वैज्ञानिक संस्थांकडून सन्मानभारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष, अमेरिकेच्या नॅशनल अ‍ॅकॅडमी आॅफ अ‍ॅग्रीकल्चर सायन्सचे परदेशी सदस्य, पंधराव्या आंतरराष्ट्रीय जनुकशास्त्र परिषदेचे अध्यक्ष यासह इटली, बांगलादेश, बिजींग, सोव्हियत, लंडनमधील ११ संस्थांमध्ये सन्मानीय सदस्यपद.राष्ट्रपतींकडून सन्मानपद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषणने सन्मानित.विज्ञान क्षेत्रातील पुरस्कारजीवशास्त्रातील योगदानासाठी शांतीस्वरुप भटनागर पुरस्कार, भारतीय विज्ञान परिषदेकडून मेघनाद साहा पदक यासह आठ पुरस्कारांचे मानकरी.आंतरराष्ट्रीय पुरस्कारझेकोस्लाव्हाकियातील मेंडेल मेमोरियल पदक, सामूहिक नेतृत्वासाठी रॅमॅन मॅगसेसे पुरस्कार, अमेरिकेतील जॉर्जिया विद्यापीठाच्या द्विशताब्दीनिमित्त पदक यांसह फिलिपाईन्स, जपान, चीन, नेदरलँड, फ्रान्स देशातील सोळा पुरस्काराने सन्मान केला आहे.

कोण आहेत स्वामीनाथन?

१९२५-७ आॅगस्ट, जन्म. १९४४-त्रावणकोर विद्यापीठातून बी.एस्सी १९४७-कोइमतूर शेतकी महाविद्यालयातून कृषी पदवी १९४८ -दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन संस्थेत जनुकशास्त्र व वनस्पती पैदाशीवर असोसिएटशिप १९४९-नेदरलँडच्या वॅजेनिन्जेन शेती विद्यापीठात युनेस्कोकडून जनुकशास्त्रासाठी फेलोशिप १९५२-इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून बटाट्यावरील संशोधनासाठी पीएच. डी. १९५२-अमेरिकेतील विस्कॉन्सिन विद्यापीठात जनुकशास्त्रातील सहायक संशोधक १९५४-कटकच्या भात संशोधन केंद्रात जनुकशास्त्र संशोधन व शेती संशोधनासाठी मार्गदर्शक १९५४ ते ७२-दिल्लीच्या भारतीय शेती संशोधन परिषदेत संशोधन, शेती संशोधनासाठी मार्गदर्शन व व्यवस्थापन १९७२ ते ७९- भारतीय शेती संशोधन संस्थेचे महासंचालक, केंद्रीय शेती व शिक्षण विभागाचे सचिव १९७९ ते ८०- केंद्रीय शेती व सिंचन विभागाचे सचिव १९८०-नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष १९८० ते ८२- नियोजन आयोगात शेती, ग्रामीण विकास, विज्ञान व शिक्षण विभागाचे सदस्य १९८२ ते ८८- फिलिपाइन्समधील आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्राचे महासंचालक १९८९-पासून चेन्नईमधील एम. एस. स्वामीनाथन संशोधन संस्थेचे अध्यक्ष २००४ -राष्ट्रीय कृषी आयोगाचे अध्यक्ष

 

(संकलन - रियाज मोकाशी)