शाहजहांपूर : चुकून सीमा ओलांडणाऱ्या व तब्बल १५ वर्षांनंतर पाकिस्तानातून भारतात परतणाऱ्या मूकबधिर गीताचे खरे पालक कोण? याचा शोध सुुरू असतानाच उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर येथील एका बँक कर्मचाऱ्याने गीता ही आपली मुलगी असल्याचा दावा केला आहे.आता दावा करणाऱ्यामध्ये शाहजहांपूरच्या तिलहर गावातील बँक कर्मचारी घुरईलाल यांचेही नाव जोडले गेले आहे. २१ फेबु्रवारी १९९५ रोजी आपली चार वर्षांची मुलगी बेबी शाळेत जाताना बेपत्ता झाली होती. बेबीला लहानपणापासूनच बोलणे आणि ऐकण्यात अडचण होती. गीता हीच आपली मुलगी बेबी असल्याचा दावा घुरईलाल यांनी केला आहे.
गीताचे पालक आहेत तरी कोण?
By admin | Updated: November 1, 2015 23:43 IST