शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

निम्म्या जगावर व्हॉट्सअ‍ॅपने घातली भुरळ

By admin | Updated: May 26, 2016 01:59 IST

संदेश पाठविण्यासाठी सध्याच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने जगातील १०९ देशांमध्ये आपले जाळे पसरवले आहे. मेसेजिंग सेवेसाठी सोपे असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला ही

नवी दिल्ली : संदेश पाठविण्यासाठी सध्याच्या काळात सर्वाधिक वापर होत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने जगातील १०९ देशांमध्ये आपले जाळे पसरवले आहे. मेसेजिंग सेवेसाठी सोपे असल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅपला ही पसंती मिळत आहे. हे अ‍ॅप जगातील १०९ देशांमध्ये वापरले जात असल्याचे सिमिलर वेब या डिजिटल मार्केटिंग इंटेलिजन्स कंपनीने हे सर्वेक्षण केले आहे. भारतामध्ये ९४.८ टक्के अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल फोन्समध्ये व्हॉट्सअ‍ॅप डाऊनलोड केले असून दिवसातील सरासरी ३७ मिनिटे त्याचा वापर होतो असे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.हे सर्वेक्षण जगातील १८७ देशांमध्ये करण्यात आले. त्यातील १०९ देशांमध्ये म्हणजे ५५.६ टक्के प्रदेशात व्हॉट्सअ‍ॅपलाच प्राधान्य मिळाले आहे. भारताप्रमाणे ब्राझील, मेक्सिको, युनायटेड किंगडम, रशिया व दक्षिण अमेरिकेतील इतर देशांमध्ये व्हॉट्सअ‍ॅपचा मोठा वापर होत आहे.दहा देशांपेक्षा लोकप्रिय अस्तित्व असणाऱ्या मेसेंजर अ‍ॅप्समध्ये वायबर आहे. पूर्व युरोपातील लोकांची वायबरला अधिक पसंती आहे. बेलारूस, माल्दोवा, युक्रेन व इतर देशांंमध्ये ते प्रथम क्रमांकावर आहे. युक्रेनमध्ये असणाऱ्या अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल संचांमध्ये ६५ टक्के संचांमध्ये वायबर डाऊनलोड केलेले असून दिवसाकाठी सरासरी १६ मिनिटे त्याचा वापर होत असल्याचे एप्रिल २०१६ च्या आकडेवारीनुसार स्पष्ट होत आहे. वायबर इराक, लिबिया, श्रीलंका अशा देशांमध्येही लोकप्रिय होत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनंतर फेसबुक मेसेंजरचा नंबर लागतो. अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया यांच्यासह ४९ देशांमध्ये त्याचे अस्तित्व आहे.लाइन, वीचॅट, टेलेग्राम ही चॅट, मेसेजिंग अ‍ॅप्सदेखील चीन, इराण, जपान अशा देशांमध्ये वापरली जात आहेत. जपानी लोकांमध्ये लाइन विशेष आवडीचे अ‍ॅप दिसून येते.