कुजबुज
By admin | Updated: December 25, 2015 02:57 IST
त्यांचे वेतन!दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या वेतनात घसघशीत वाढ करून त्यांचा दुवा घेतला. इकडे पार्सेकर यांनी आपण असे काही करणार नसल्याचे आधीच सांगून टाकलेय. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांना वेतनवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे खरे. केजरीवालांचा वेतनवाढीचा विषय विरतो न विरतो तोच आता संसदेत खासदारांचेही वेतन वाढविण्याच्या हालचाली ...
कुजबुज
त्यांचे वेतन!दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आमदारांच्या वेतनात घसघशीत वाढ करून त्यांचा दुवा घेतला. इकडे पार्सेकर यांनी आपण असे काही करणार नसल्याचे आधीच सांगून टाकलेय. त्यामुळे विधिमंडळ सदस्यांना वेतनवाढीसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागणार हे खरे. केजरीवालांचा वेतनवाढीचा विषय विरतो न विरतो तोच आता संसदेत खासदारांचेही वेतन वाढविण्याच्या हालचाली चालल्या आहेत. असा बोलबाला आहे की, एकेका खासदाराचा मासिक पगार 2 लाख 80 हजार होणार आहे. मूळ वेतनात 50 हजार रुपये वाढ, मतदारसंघ भत्त्यामध्ये 45 हजार रुपये वाढ तसेच इतर भत्त्यांमध्ये वाढ मिळून एकूण वेतन पावणेतीन लाखांवर पोचणार आहे. हे ऐकून गोव्यातील काही आमदारांचे डोळे विस्फारले आहेत. यातील निम्मा पगार जरी आम्हाला मिळाला तरी पुरेसा आहे, असे काहीजण म्हणू लागले आहेत.