सोनभद्र (उत्तरप्रदेश) : पंतप्रधान मोदी यांनी एक रोड शो केला. तो फसला. आता दुसरा रोड शो करु लागले आहेत. तो सुद्धा फसेल. रोड शो करता करता ते आता दुसरीकडेच निघून जातील, अशी टीका मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली आहे. वाराणसीत मोदी यांचा शनिवारी झालेला रोड शो आणि रविवारचा रोड शो याचा संदर्भ देऊन ते बोलत होते. भाजपने म्हटले आहे की, वाराणसीत शनिवारी झालेला रोड शो नव्हता. काशी विश्वनाथ आणि अन्य मंदिरात मोदी दर्शनासाठी गेले होते. दरम्यान, भाजपवर टीका करताना अखिलेश म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील जनतेने मोठ्या प्रमाणात भाजपचे खासदा निवडून दिले होते. पण, या खासदारांनी काय काम केले आहे? मोदी यांना सवाल करताना त्यांनी म्हटले आहे की, आपण ‘मन की बात’ करता पण, ‘काम की बात’ कधी करणार आहात. >ही दोन तरुणांची आघाडी आहे...संपूर्ण जगात फिरता पण, येथील लोकांना आपण भेटला आहात काय? तर, काँग्रेस व सपाच्या आघाडीवर बोलताना ते म्हणाले की, ही दोन तरुणांची आघाडी आहे. देश आणि राज्यातील राजकारण यामुळे बदलून जाणार आहे.
रोड शो करताना मोदी दुसरीकडेच निघून जातील
By admin | Updated: March 6, 2017 04:35 IST