शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

५० हजारांची लाच घेताना विक्रीकर उपआयुक्तास अटक

By admin | Updated: July 10, 2015 00:32 IST

नाशिक : विक्रीकराचा भरणा करण्याची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विक्रीकर उपआयुक्तअमृतसिंग उत्तमराव ठाकूर यास कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकारानंतर त्याच्या कार्यालय आणि घराची झडती घेण्याचे काम सुरू झाले असून, उशिरापर्यंत हे काम सुरू होते.

नाशिक : विक्रीकराचा भरणा करण्याची रक्कम कमी करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच घेताना नाशिकच्या विक्रीकर उपआयुक्तअमृतसिंग उत्तमराव ठाकूर यास कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या प्रकारानंतर त्याच्या कार्यालय आणि घराची झडती घेण्याचे काम सुरू झाले असून, उशिरापर्यंत हे काम सुरू होते.शहरातील पाथर्डी फाटा येथे असलेल्या विक्रीकर विभागाच्या कार्यालयात सायंकाळी साडेचार वाजता या उपआयुक्तास पकडण्यात आले. नाशिक येथील एका कंपनीला १ एप्रिल २०१० ते ३१ मार्च २०११ या आर्थिक वर्षात वित्तीय निर्धारण आदेशाअंतर्गत कर, दंड आणि व्याजाची रक्कम अशी तीन कोटी २५ लाख रुपये भरण्याचे पत्र ठाकूर यांनी गेल्या ३१ मार्च रोजी दिले होते. सदरची रक्कम कंपनीला अमान्य असल्याने कंपनीच्या अधिकार्‍यांनी ठाकूर यांची भेट घेतली. त्यावर सदरचे आदेश रद्द करण्यासाठी ठाकूर यांनी कंपनीच्या अधिकार्‍याकडे दीड लाख रुपयांची मागणी केली होती. मात्र त्यावर तडजोड होऊन ५० हजार रुपयांची रक्कम घेण्याचे त्यांनी मान्य केले. त्यामुळे संबंधित अधिकार्‍यांनी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या विभागाच्या सूचनेनुसार सापळा रचण्यात आला आणि गुरुवारी सायंकाळी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाथर्डी येथील कार्यालयातच ठाकूर यास रंगेहाथ पकडण्यात आले. या घटनेनंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. त्याचबरोबर ठाकूर यांचे कार्यालय आणि घरातही झडती सत्र सुरू होते.सामान्यत: विक्रीकर खात्यात दलालामार्फत लाच घेतली जात असल्याने विक्रीकर खात्यात लाचखोर असूनही ते सहजासहजी पकडले जात नाहीत, परंतु गेल्या काही महिन्यांत अनेक ठिकाणी विक्रीकर खात्याचे अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. नाशिकमध्ये थेट उपआयुक्तच रंगेहात पकडला गेल्याने विक्रीकर विभागातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.