शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
3
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
4
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
5
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
6
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
7
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
8
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
9
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
10
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
11
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
12
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
13
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
14
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
15
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
16
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
17
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
18
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
19
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
20
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 

पोलिसांचा धाक गेला कुठे?

By admin | Updated: February 14, 2015 01:07 IST

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

हायकोर्ट : समाजातील वाढत्या उद्दामपणावर चिंता

नागपूर : समाजात उद्दामपणाची पातळी वाढत असल्याने व पोलिसांचा धाक हळूहळू कमी होत असल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चिंता व्यक्त केली आहे.
वाशीम जिल्ह्यातील रिसोड पोलीस ठाण्यात काही आरोपींनी गोंधळ घालून एका जणाला मारहाण केली होती. पोलिसांपुढेच असा प्रकार घडल्यामुळे न्यायमूर्तीद्वय अरुण चौधरी व प्रदीप देशमुख यांनी व्यथित होऊन एकंदरित परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. याप्रकरणातील आरोपींनी फिर्यादीसोबत तडजोड करून एफआयआर रद्द करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत उच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने कायद्यातील तरतुदीनुसार अर्ज मंजूर केला पण, घटनेची गंभीर दखल घेऊन आरोपी व फिर्यादीला २४ फेब्रुवारीपूर्वी वाशीम पोलीस अधीक्षक कार्यालयात ५० हजार रुपये जमा करण्याचे निर्देश दिले. ही रक्कम न भरल्यास पोलिसांनी आरोपींना अटक करून त्याची माहिती न्यायालयाला द्यावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय भविष्यात अशाप्रकारचे उद्दाम वर्तन करणार नाही असे प्रतिज्ञापत्र व हमीपत्र दोन आठवड्यांत न्यायालयात सादर करण्यास आरोपींना सांगण्यात आले आहे. आरोपींना याचिकेचा खर्च म्हणून ५ हजार रुपये भरण्याचेही निर्देश देण्यात आले आहे.
आरोपींना धडा मिळावा यासाठी अशाप्रकारचे आदेश देणे आवश्यक आहे. परंतु, यानंतरही आरोपी भविष्यात गोंधळ घालणार नाही याची आम्हाला खात्री नसल्याचे मत न्यायालयाने एकूण चित्र लक्षात घेता व्यक्त केले आहे.
--------------------
काय आहे प्रकरण
८ नोव्हेंबर २०१४ रोजी अरुण मगर व इतर चौघांनी उमेश सरनाईक याला वाईन बारमध्ये मारहाण केली. यामुळे उमेश पळून पोलीस ठाण्यात आला. आरोपी लोखंडी पाईप घेऊन मोटरसायकलने पोलीस ठाण्यात पोहोचले व पोलिसांपुढे उमेशला मारहाण केली. यामुळे टेबलवरील काच फुटला. यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ३०७, १४३, १४८, १४९ व मुंबई पोलीस कायद्याच्या कलम १३५ अन्वये गुन्हा नोंदविला.