शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

जिथे पोलीस सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचं काय - मोदींचा बिहारवासीयांना सवाल

By admin | Updated: October 9, 2015 13:18 IST

पाटण्यात काल एका पोलिसावरच हल्ला झाला, ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचे काय हाल होतील असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहार सरकारवर टीका केली

ऑनलाइन लोकमत
सासाराम, दि. ९ - पाटण्यात काल एका पोलिसावरच हल्ला झाला, ज्या राज्यात पोलिसच सुरक्षित नाहीत, तिथे सर्वसामान्यांचे काय हाल होतील असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्य सरकारवर टीका केली. बिहार विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरल्याच्या पार्श्वभूमीवर सासाराम येथील सभेत ते बोलत होते.
गस्तीवर असलेले एएसपी राकेश कुमार यांच्यावर दोन अज्ञातांनी काल रात्री हल्ला केला, त्याचाच दाखला जनतेच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसांवरच जिथे हल्ला होते, तिथे सर्वसमान्यांचे काय होईल, असा सवाल विचारत पंतप्रधानांनी जंगलराज सरकारवर टीकास्त्र सोडले
या सभेत त्यांनी महाघाडीच्या नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला.  इतकी वर्ष जे नेते एकमेकांना पाण्यात होते ते आता खुर्चीसाठी एकत्र आले आहेत, सत्तेच्या मोहासाठी त्यांनी हे 'महास्वार्थबंधन' बनवले असल्याचे मोदी म्हणाले. या नेत्यांनी गेल्या ६० वर्षांत बिहारचे अतोनात नुकसान केले, राज्यातील अनेक उद्योग बंद पडल्याने लाखो तरूण रोजगारासाठी बाहेरच्या राज्यात गेले आहेत. मात्र या नेत्यांना त्यांची चिंता नाहीये, त्यांना फक्त अपहरण करणं, खंडणी गोळा करणं हीच कामं येतात.  जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत अपहरणाच्या तब्बल ४ हजार तक्रारी नोंदवल्या गेल्याचे नमूद करत तुम्हाला राज्यात पुन्हा 'जंगलराज' हवे आहे का असा सवाल जनतेला केला. 
पाच वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्यावेळी या नेत्यांनी तुम्हाला वीजेचे आश्वासन दिले होते आणि वीज न मिळाल्यास पुन्हा मत मागायला येणार नाही अशी वल्गनाही त्यांनी केली. आज पाच वर्ष उलटून गेल्यानंतरही तुमच्याकडे वीज नाहीये आणि तरी हे नेते पुन्हा तुमच्या दारात मतांसाठी आले आहेत.  आता तुम्ही त्यांना मत न देता जाब विचारा, असंही मोदी म्हणाले. 
बिहारमध्ये गेल्या ६० वर्षात झालेले नुकसान मी ५ वर्षांत भरून काढेन, तुम्ही त्यांना ६० वर्ष दिली आता एनडीएला ६० महिने देऊन बघा. ही निवडणूक बिहारचे नुकसान करणा-यांना धडा शिकवण्यासाठी आहे, 'जंगलराज'पासून मुक्ती मिळवण्यासाठी विकासाचा एकच मार्ग तुमच्यासमोर आहे. एनडीएला बहुमताने विजयी करा आणि विकासाच्या मार्गावर पुढे पाऊल टाका, असे आवाहन मोदींनी जनतेला केले.