शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

कुठे गेली मोदी सरकारची पारदर्शकता?

By admin | Updated: May 7, 2015 02:43 IST

मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला.

सोनिया गांधी यांनी विचारला जाब : सीआयसी, सीव्हीसीची पदे वर्षभर रिक्तनवी दिल्ली : मुख्य दक्षता आयुक्त (सीव्हीसी) आणि मुख्य माहिती आयुक्त (सीआयसी) ही पदे जवळ जवळ वर्षभरापासून रिक्त ठेवणाऱ्या मोदी सरकारची पारदर्शकता कुठे गेली? यापूर्वी केलेल्या पारदर्शकतेच्या बाता पाहता ही तर कोलांटउडीच (यू-टर्न) ठरते, असे सांगत काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकसभेत सरकारला रोखठोक जाब विचारला. मात्र प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत सरकारने सोनियांचे आरोप फेटाळून लावले. सरकारने हेतुपुरस्सर ही पदे रिक्त ठेवली असून उत्तरदायित्वापासून बचाव करण्याचा त्यामागे उद्देश आहे, असे त्या म्हणाल्या. लोकसभेत हा मुद्दा उपस्थित करताना त्या म्हणाल्या, की सीव्हीसी आणि सीआयसीची पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त आहेत. अद्याप लोकपालांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्यावेळी पारदर्शकता आणि सुशासनाचे आश्वासन दिले होते, ते कुठे गेले असा सवाल करीत सोनियांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांनी स्थगन प्रस्तावाची सूचना दिली असता, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी ती फेटाळली़ मात्र प्रश्नोत्तराच्या तासानंतर मुद्दा उपस्थित करण्याला परवानगी दिली.

माहिती अधिकार निष्प्रभ करण्याचा डाव माहिती अधिकार कायद्यानुसार येणारे उत्तरदायित्व टाळण्यासाठी सरकारने माहिती अधिकार कायदा (आरटीआय) निष्प्रभ करण्याचा डाव रचल्याचा आरोपही त्यांनी केला. आरटीआय कायदा ऐतिहासिक असून, त्यामुळेच लोकांना सरकारला जाब विचारण्याचा अधिकार मिळाला आहे. आरटीआयअंतर्गत ३९ हजार प्रकरणे निलंबित असल्याची कबुली सरकारने दिली आहे. माहिती देण्यास विलंब म्हणजे माहिती देण्यास नकारच ठरतो. ही स्थिती कदापि खपवून घेतली जाणार नाही. दोषींचा बचाव केला जाऊ नये, असा इशाराही सोनिया यांनी दिला. ... हा तर स्वायत्ततेवर हल्ला > मुख्य माहिती आयुक्तांचे (सीआयसी) आर्थिक अधिकार कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या सचिवांकडे सुपुर्द करण्यात आले आहेत. हा सीआयसीच्या स्वायत्ततेवर घाला आहे. > सरकारला जबाबदारी झटकायची आहे. सरकारला एका पाठोपाठ वटुहुकूम आणण्याची घाई झाली असून, व्हिसल ब्लोअर कायद्यावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असतानाही वटहुकूम जारी करण्यात आलेला नाही. त्यामुळे सरकारच्या हेतूबाबत प्रश्नचिन्ह उभे ठाकते, असेही त्या म्हणाल्या.