शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

कुठे आणि कसे जातील ओबामा

By admin | Updated: January 25, 2015 02:09 IST

अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय बहुप्रतीक्षित दौऱ्यात दोन्ही देशांकडून हवामान बदल, संरक्षण व आर्थिक सहकार्य आदी क्षेत्रांत सहकार्य वाढीसाठी प्रयत्न केले जातील.

वॉशिंग्टन : अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या तीन दिवसीय बहुप्रतीक्षित दौऱ्यात दोन्ही देशांकडून हवामान बदल, संरक्षण व आर्थिक सहकार्य आदी क्षेत्रांत सहकार्य वाढीसाठी प्रयत्न केले जातील. एअरफोर्स वन विमान जर्मनीच्या रामस्टीन येथे इंधन भरण्यासाठी काही वेळ थांबणार असून, ओबामा रविवारी सकाळी १० वाजता राजधानी दिल्लीतील पालमच्या एअरफोर्स तळावर उतरणार आहेत. ओबामा यांचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राष्ट्रपती भवन येथे दुपारी १२ वाजता औपचारिक स्वागत केले जाईल.यानंतर ते राजघाटावर जाऊन महात्मा गांधी यांना आदरांजली वाहतील आणि नंतर ते एका वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. व्हाइट हाउसने सांगितले की, ओबामा यानंतर मोदी यांच्यासोबत हैदराबाद हाउस येथे दुपारी भोजनाचा आस्वाद घेतील व तेथे भारतीय पंतप्रधानांसोबतच्या ‘वॉक अ‍ॅण्ड टॉक’मध्ये सहभाग घेतील. यानंतर उभय नेते प्रचंड मोठ्या शिष्टमंडळस्तरीय बैठकीत सहभागी होतील. सुमारे तासभर ही बैठक चालेल. रविवारी संध्याकाळी ओबामांचा आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये अमेरिकी दूतावासातील कर्मचारी व कुटुंबीयांच्या स्नेहमिलनाचा कार्यक्रम आहे. यानंतर रात्री राष्ट्रपती मुखर्जी यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला ते जातील. ओबामांना असते चौफेर सुरक्षाकवचअमेरिकेचे सुपर पॉवर राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासाठी अभेद्य सुरक्षाकवच असते. अमेरिकेच्या अनेक सुरक्षा संस्था त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी पार पाडतात. कोण आहेत हे रक्षक यावर एक नजर.़बंदुकीच्या गोळीपेक्षा जलद, बिबट्याहूनही चपळ आणि प्रत्येक धोका लगेच ओळखणारे अशी खाती असणारे कमांडोज् या सीक्रेट सर्व्हिस एजंटकडे आहेत. त्यांची ताकद अख्ख्या जगाला माहीत आहे. या कमांडोज्च्या कोटावर लागलेले मायक्रोफोन व कानावर इअर पीस हे नेहमी कंट्रोलरूमशी जोडलेले असतात. नवीन टेक्नॉलॉजी व एकापेक्षा एक मोठ्या शस्त्राने परिपूर्ण असे हे एजंट कुठल्याही धोक्याला एका क्षणात शोधून संपवून टाकतात. सुरुवातीला सीक्रेट सर्व्हिसजवळ साध्या बंदुका असत. 1930 नंतर त्यांच्या श्रेणीत बदल करण्यात आला. प्रथमच ४५ कोअरची गोल्डफिस्ट आणि नंतर १९६0च्या दशकात या एजंटजवळ स्मिथ वेपन मॉडेल व गोल्ड ३८ स्पेशल डिटेक्टिव्ह रिव्हॉल्व्हर आली. 1981ते ९१च्या काळात सीक्रेट सर्व्हिस मॅग्नम रिव्हॉल्व्हरने सज्ज झाली. एसआयजी, सॉसर, पी झेड २९ गन, एफएन ५७ फिस्टर, एसआर रायफल, रेव्हिंटन शॉटगन आणि कित्येक अत्याधुनिक शस्त्रे असतात. 1965मध्ये यूएस सीक्र्रेट सर्व्हिसची स्थापना बनावट नोटांना थांबविण्यासाठी झाली होती. पण नंतर अमेरिकी राष्ट्रपतींच्या सुरक्षेची जबाबदारी याच संस्थेवर टाकण्यात आली. सीक्रेट सर्व्हिसची झलक हॉलीवूड सिनेमांतही पाहायला मिळते. ‘इन द लाइन आॅफ फायर’, ‘आॅॅलम्पस हॅज फॉलेन’ या हॉलीवूडपटांमध्ये सीक्रेट सर्व्हिसचे काम कसे चालते, तेही दिसले. राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी ५00 जवान तयार असतात. ज्यांची संख्या वेळेनुसार कमी-अधिक केली जाते. भारत भेटीवेळी ओबामांसोबत नेव्ही सीलचे कमांडोसुद्धा आहेत.सेंट्रल इन्टेलिजन्स एजन्सीचे आॅफिसर राष्ट्राध्यक्षांसोबत असतात. कुठलीही गुप्तवार्ता त्यांच्यापर्यंत अतिवेगाने पोहोचते, असे म्हटले जाते.राष्ट्राध्यक्षच नव्हे, तर अमेरिकेच्या जनतेला सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी पार पाडणारी ही संस्था ९/११ टिष्ट्वन टॉवर हल्ल्यानंतर अधिक प्रखरतेने समोर आली. ही संस्था अमेरिकेवरील दहशतवादी कारवायांना थांबविण्याचे काम करते. सायबर हल्ल्यांपासूनही वाचविते व पर्यटनासंबंधी धोक्याच्या सूचना देते; शिवाय कुठल्याही धोक्याबाबत बाहेरील देशालासुद्धा सावध करते. यात २.४0 लाख कर्मचारी कामावर असतात. यांचे काम फक्त अमेरिकेला सुरक्षित ठेवणे हे असते.