शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

‘जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा हरणेच चांगले; हरयाणाच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची पोस्ट

By राकेशजोशी | Updated: April 19, 2024 05:37 IST

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे.

राकेश जोशी, लोकमत न्यूज नेटवर्कचंडीगड : मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हरयाणात लोकसभेच्या दहा जागांसाठी मतदान होणार आहे. भाजपने उमेदवार जाहीर करून प्रचाराला सुरुवात केली असताना या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला रणांगणात दिसत नसल्याने ते राजकीय अज्ञातवासात आहेत की, पडद्यामागचे सूत्रधार याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

इंडियन नॅशनल लोकदलपासून वेगळे होऊन स्थापन झालेला दुष्यंत चौटाला यांचा जननायक जनता पक्ष राज्यातील सत्तेतून पायउतार होताच विस्कळीत झाला. पक्षाचे एकेक नेते पक्ष सोडत आहेत. हरयाणात भाजपसोबतची युती तोडल्यानंतर जेजेपीला ग्रहण लागल्याचे दिसत असताना दुष्यंत चौटालाही राजकारणातून हद्दपार झाल्याचे चित्र आहे.

आयएनएलडीपासून फारकत घेऊन जेजेपीची स्थापना झाली. २०१९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेजेपीने १० जागा जिंकत भाजपसोबत सरकार चालवले. दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले. भाजपशी असलेली युती तुटल्यानंतर जेजेपी पक्ष अक्षरश: मोडकळीस आला. त्यामुळे दुष्यंत चौटाला यांचे राजकीय अस्तित्व संपले का, असा सवाल उपस्थित होत आहे.

मातोश्रींना मागावी लागली माफी

  • अल्पवयात राजकारणात आलेल्या दुष्यंत चौटाला यांना पक्षापासून रस्त्यापर्यंत संघर्ष करावा लागत आहे. सत्तेत असताना, नसताना ते टीकेचे धनी बनले. विशेषत: शेतकरी आंदोलनकर्त्यांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागले.
  • आंदोलनकर्त्यांचा रोष प्रचंड असल्याने त्यांना गाडीतून उतरावे लागले. अखेर त्यांच्या मातोश्री नैना चौटाला यांनी आंदोलनकर्त्यांची माफी मागावी लागली.
  • सत्तेत असताना स्थानिक युवकांना शासकीय नोकरीत आरक्षण दिल्याचे वचन त्यांनी पाळले नसल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे. महिला कॉन्स्टेबल भरतीवेळीही त्यांच्यावर टीका झाली.

म्हणूनच हताश दुष्यंत म्हणतात...- जेजेपीचे वरिष्ठ उपाध्यक्ष या नात्याने माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचे केलेले सर्व प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. - अनेक नेते अन्य पक्षांत प्रवेश करत असल्याने निराश चौटाला यांना त्यांच्या एक्स हँडलवर लिहावे लागले की, जेव्हा युद्ध स्वतःच्या लोकांशी होते तेव्हा ते हरणेच चांगले.

टॅग्स :Haryanaहरयाणाharyana lok sabha election 2024हरियाणा लोकसभा निवडणूक निकाल २०२४