शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
2
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
3
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
4
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
5
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
6
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
7
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
8
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
9
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
10
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
11
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
12
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
13
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
14
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
15
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
16
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
17
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
18
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
19
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
20
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला

संपूर्ण व्यापमंचा तपास केव्हा हाती घेणार ?

By admin | Updated: July 25, 2015 00:06 IST

निगराणीच्या मुद्यावर निर्णय घेता यावा यासाठी व्यापमं घोटाळा प्रकरणांचा संपूर्ण तपास हाती घेण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दलची माहिती

नवी दिल्ली : निगराणीच्या मुद्यावर निर्णय घेता यावा यासाठी व्यापमं घोटाळा प्रकरणांचा संपूर्ण तपास हाती घेण्यासाठी किती वेळ लागणार, याबद्दलची माहिती एक आठवड्याच्या आत देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सीबीआयला दिले.मध्य प्रदेशच्या एसआयटी/ एसटीएफच्या हातात असलेला व्यापमं घोटाळ्याचा संपूर्ण तपास तुम्ही (सीबीआय) नेमका केव्हा आपल्या हाती घेणार, हे आम्हाला जाणून घ्यावयाचे आहे. कारण सीबीआय चौकशीवर आम्ही निगराणी ठेवायची की अन्य कुणाला निगराणीसाठी सांगायचे आणि निगराणीसाठी कोणकोणत्या बाबींची आवश्यकता आहे, याबद्दल आम्हाला निर्णय घ्यावयाचा आहे, असे पीठाने म्हटले आणि या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जुलैपर्यंत स्थगित केली.सीबीआयचे प्रतिनिधित्व करणारा वकील केव्हा नेमणार, अशी विचारणाही या पीठाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंग यांना केली. या व्यापमं घोटाळ्यातून मोठ्या प्रमाणावर प्रकरणे पुढे येत असल्याने सीबीआयचे प्रतिनिधित्व करण्यासाठी एकापेक्षा जास्त वकिलांची गरज पडेल, असे मध्य प्रदेश सरकारचे वकील एल. नागेश्वर राव म्हणाले. तर आपण पुढच्या शुक्रवारी या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास सक्षम असणार, असे मनिंदर सिंग यांनी न्यायालयाला सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)