शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा आकृतिबंध वाढणार कधी? सत्ता बदलली कर्मचारी घरी: स्थानिक राजकारणात भरडतोय ग्रा़पं़ कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2015 00:24 IST

सोलापूर: शिवाजी सुरवसे

सोलापूर: शिवाजी सुरवसे
ग्रामपंचायती सक्षम करायच्या़़ग्रामपंचायतींना थेट अनुदान द्यायच़े़सर्व कारभार ऑनलाईन करण्याच्या एकीकडे वल्गना केल्या जात असतानाच त्या ग्रामपंचायतींमधील कर्मचार्‍यांच्या आकृतिबंधाकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष आह़े रोजंदारी म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी स्थानिक राजकारणाचे बळी ठरतात़ सत्ता बदलली की त्यांना घरी पाठविले जाते, त्यामुळे आकृतिबंध वाढवून द्यावा, सेवेची त्या कर्मचार्‍यांना हमी देण्याची मागणी शासनाकडे होत आह़े
ग्रामपंचायत स्तरावर कर्मचार्‍यांची सेवापुस्तके नाहीत़ त्यामुळे ग्रामपंचायती ठराव करुन, रोजंदारी कर्मचारी भरती करतात़ मात्र या कर्मचार्‍यांना सेवेची कोणतीही हमी नाही़ सत्ता बदलली की आपल्या र्मजीतील कर्मचार्‍यांची नियुक्ती करणे आणि असलेल्या कर्मचार्‍यांना ठराव घेऊन घरी पाठविणे हा ‘एककलमी’ कार्यक्रम असतो़ पाच हजारांवर लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना आकृतिबंधानुसार अवघे सहा कर्मचारी दिले गेले आहेत़
अनेक ग्रामपंचायती मोठय़ा झाल्या़ लोकसंख्या वाढली आहे मात्र कर्मचारी संख्या नसल्यामुळे नागरी सुविधा देणे अवघड होत आह़े 2011 च्या जनगणनेनुसार 211 ग्रामसेवक जिल्?ात वाढले मात्र ग्रामपंचायत कर्मचार्‍यांची पदे वाढली नाहीत़ आकृतिबंधामध्ये असलेल्या कर्मचार्‍याचे वय 45 झाले की त्याला सेवाज्येष्ठताच्या यादीतून देखील काढले जात़े त्यामुळे या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या सेवेची हमी नाही़ आकृतिबंधात असलेल्या कर्मचार्‍यांना फंड आणि तुटपुंजे वेतन दिले जात़े या वेतनातील 50 टक्के हिस्सा शासनाकडून ग्रामपंचायतींना दिला जातो़ आकृतिबंधाबाहेर जाऊन लोकांच्या सेवेसाठी अनेक रोजंदारी कर्मचार्‍यांची नियुक्ती ग्रामपंचायती करतात, त्या कर्मचार्‍यांना कोणताही लाभ दिला जात नाही, त्यामुळे त्यांना आकृतिबंधाची अट शिथिल करुन, जिल्हा सेवेत घेण्याची मागणी होत आह़े
दीड हजार लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींना स्वतंत्र ग्रामसेवक नाही, कर्मचार्‍यांचा आकृतिबंध नाही, अनेक ग्रामपंचायतींना स्वत:च्या इमारती नाहीत, अशी वाईट अवस्था ग्रामपंचायतींची आह़े त्यामुळे ग्रामपंचायती सक्षम करण्यासाठी प्राथमिक गोष्टी पूर्ण केल्या पाहिजेत, तरच ग्रामपातळीवर गावगाडा नीट चालेल़ अकलूजसारख्या आशिया खंडातील मोठय़ा ग्रामपंचायतीमध्ये अवघे 6 कर्मचारी आकृतिबंधात आहेत, आम्ही 70 कर्मचारी रोजंदारी नेमले आहेत, त्यामुळे या मूलभूत बाबीकडे लक्ष देण्याची मागणी जि़प़ सदस्य आणि ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी शासनाकडे केली आह़े

कोट़़़
सोलापूर जिल्?ात एकूण 1028 ग्रामपंचायती आहेत़ या ग्रामपंचायतींमध्ये आकृतिबंधाप्रमाणे नेमलेले अवघे 2067 कर्मचारी आहेत़ आकृतिबंधातील कर्मचार्‍यांना किमान वेतन निधीच्या 50 टक्के वेतन शासनाकडून दिले जात़ लोकसंख्या वाढली आहे, त्यामुळे त्या त्या ग्रामपंचायतीकडून वारंवार कर्मचार्‍यांची वाढीव मागणी होत आह़े आकृतिबंधामध्ये कर्मचारी असले तर त्यांना सेवा, नियम लागू होतात़ जि़प़ कडे त्यांना सेवाज्येष्ठता यादीनुसार घेता येत़े शासन पातळीवरुन कर्मचार्‍यांचा आकृतिबंध वाढवून द्यावा़
मनीषा देसाई
जि़प़ उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत)

कोट़़
ग्रामपंचायतीमधील लोकसंख्या वाढली आह़े आकृतिबंध 25-30 वर्षांपूर्वीचा आहे ़ त्यामुळे अवघ्या पाच-सहा कर्मचार्‍यांवर ग्रामपंचायतीचा कारभार करणे अवघड आह़े तो वाढवून दिला पाहिज़े अकलूजसारख्या ग्रामपंचायतीमध्ये आकृतिबंधात अवघे सहा कर्मचारी आहेत़ रोजंदारीवर घेतले 70 कर्मचारी आहेत़ सत्ता बदलली की या कर्मचार्‍यांना बदलले जात़े त्यांना कोणत्याही सेवा अटी, नियम, वेतन दिले जात नाही़ राज्यातील सर्व ग्रामपंचायतींचा हा प्रश्न आह़े त्यामुळे शासनाने याबाबत निर्णय घ्यावा़
धैर्यशील मोहिते-पाटील
अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कर्मचारी युनियन

जिल्?ातील ग्रामपंचायती व त्यावरील आकृतिबंधाप्रमाणे नेमलेले कर्मचारी
-अक्कलकोट (115 ग्रामपंचायती)- 198 कर्मचारी
-बार्शी (130 ग्रामपंचायती)- 243 कर्मचारी
-माढा (109 ग्रामपंचायती)- 213 कर्मचारी
-करमाळा (105 ग्रामपंचायती)- 167 कर्मचारी
-माळशिरस (108 ग्रामपंचायती)- 226 कर्मचारी
-मंगळवेढा (77 ग्रामपंचायती)- 143 कर्मचारी
-मोहोळ (95 ग्रामपंचायती)-212 कर्मचारी
-उ़ सोलापूर (36 ग्रामपंचायती)- 66 कर्मचारी
-पंढरपूर (94 ग्रामपंचायती)- 229 कर्मचारी
-सांगोला (76 ग्रामपंचायती)- 188 कर्मचारी
-द़ सोलापूर (83 ग्रामपंचायती)- 183 कर्मचारी
एकूण 1028 ग्रामपंचायती -2067 कर्मचारी

ग्रामपंचायती संदर्भात फोटो टाकण़े़़