ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - फेसबुकप्रमाणेच आता वॉट्स अॅपवर लाईकचा पर्याय तसेच चॅट करताना 'मार्क अॅज अनरिड' हे दोन महत्त्वाचे पर्याय मिळण्याची चर्चा आहे. मात्र अद्याप वॉट्स अॅपकडून या वृत्ताला दुजोरा मिळालेला नाही.
तंत्रज्ञानविषयक वेबसाईट्सवर गेल्या काही दिवसांपासून वॉट्स अॅपमध्ये काही सुधारणा केल्या जाणार असल्याचे वृत्त दिले आहे. यानुसार फेसबुकप्रमाणेच वॉट्स अॅपवर येणा-या फोटोंनाही 'लाईक' करण्याचा पर्याय दिला जाईल असे या वृत्तात म्हटले आहे. मात्र हा पर्याय कसा दिला जाईल व कधीपर्यंत सुरु होईल हे अद्याप समजू शकलेले नाही. याशिवाय सध्या वॉट्स अॅपवर मॅसेज वाचल्यावर 'रिड' केल्याचे चिन्ह येते. यावरही वॉट्स अॅपने नवीन पर्याय देण्याचा निर्णय घेतला असून आता युजर्सना वाचलेल्या मॅसेजलाही 'मार्क अॅज अनरिड' असा पर्याय निवडता येईल. काही युजर्सनी या संदर्भातील स्क्रिनशॉट्सही शेअर केल्याचे समजते.