शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळ्यावर मोदी गप्प का? कर्नाटकमध्ये जोरदार सभा; राहुल गांधी यांनी विचारला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 00:14 IST

पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ््याबद्दल स्वत:चा देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, अशा शब्दांत रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील हल्ले सुरूच ठेवले.

मुलावड (कर्नाटक) : पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या हजारो कोटी रूपयांच्या घोटाळ््याबद्दल स्वत:चा देशाचे चौकीदार म्हणून उल्लेख करून घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, अशा शब्दांत रविवारी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधानांवरील हल्ले सुरूच ठेवले.कर्नाटकमध्ये येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. गांधी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय यांच्या मालकीच्या कंपनीच्या अचानक वाढलेल्या उलाढालीबद्दल कोणतीच कारवाई का करीत नाहीत, असा प्रश्न मोदी यांना विचारला.‘मोदी जी कर्नाटकात येतात व भ्रष्टाचाराबद्दल बोलतात. त्यांनी (मोदी) देशवासियांना सांगितले होते की मला पंतप्रधान नव्हे तर देशाचा चौकीदार बनवा, असे राहुल गांधी म्हणाले. मोदी यांच्या एका हाताला तुरुंगात जाऊन आलेले त्यांच्या पक्षाचे माजी मुख्यमंत्री (बी. एस. येद्दुयुरप्पा) आणि दुसºया हाताला भाजपच्या सरकारमधील चार माजी मंत्री (हेदेखील तुरुंगात जाऊन आलेले) यांच्यामध्ये मोदी बसून भ्रष्टाचाराच्याविरोधात बोलतात, असा हल्ला राहुल गांधी यांनी केला. अमित शाह यांच्या मुलाने अवघ्या तीन महिन्यांत ५० हजार रूपयांचे ८० कोटी रूपये बनवले आणि देशाचे चौकीदार त्याची ना चौकशी करतात ना त्याबद्दल एखादा शब्द उच्चारतात, असा आरोप गांधी यांनी केला.अमित शाह यांनी त्यांचा मुलगा जय यांच्यावर भ्रष्टाचाराचे झालेले आरोप फेटाळले. भाजप २०१४ मध्ये सत्तेवर आल्यावर जय शाह यांचा व्यवसाय प्रचंड गतीने वाढला अशी बातमी दिलेल्या न्यूज पोर्टलवर जय शाह यांनी बदनामीचा फौजदारी दावा दाखल केला आहे. राहुल गांधी हे कर्नाटकच्या उत्तरेकडील भागांच्या तीन दिवसांच्या दौºयावर असून रविवार हा त्याचा दुसरा दिवस होता. त्यांची ही पंधरवड्यापेक्षाही कमी कालावधीत राज्याची दुसरी भेट आहे.वृक्षथॉनला हिरवा झेंडाविजयपुरा : पर्यावरण, पाणी आणि वृक्षांच्या लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी निघणाºया वृक्षथॉनला गांधी यांनी रविवारी येथे हिरवाझेंडा दाखवला. पिवळ््या रंगाचा टी शर्ट त्यांच्या अंगात होता. समाजातील वेगवेगळ््या थरांतील शेकडो लोक यावेळी उपस्थित होते.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Rahul Gandhiराहुल गांधीPunjab National Bankपंजाब नॅशनल बँक