शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

न्यायपालिकेला टाळे लावायचे काय?

By admin | Updated: October 29, 2016 01:51 IST

उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या रखडवून सरकार न्यायप्रणाली ठप्प पाडू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फटकारले.

नवी दिल्ली : उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या नियुक्त्या रखडवून सरकार न्यायप्रणाली ठप्प पाडू शकत नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी सरकारला फटकारले. कॉलेजियमने खूप आधी शिफारशी करूनही न्यायमूर्तींच्या नियुक्त्या न केल्यामुळे संतप्त पीठाने अशाने न्यायालये बंद पडून न्याय कुलूपबंद होईल, असे खडे बोलही सुनावले. ‘तुम्ही संपूर्ण प्रणाली बंद पाडू शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या नावाविषयी समस्या असेल तर ते नाव फेरविचारासाठी आमच्याकडे परत पाठवा, असे सरन्यायाधीश टी.एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने केंद्राचे प्रतिनिधी महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांना सुनावले. उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींच्या नियुक्त्यांना होत असलेल्या विलंबाबाबत संताप व्यक्त करताना पीठाने कर्नाटक उच्च न्यायालयाचे उदाहरण दिले. न्यायमूर्तींअभावी तेथील न्यायदान कक्षांच्या एका संपूर्ण मजल्याला कुलूप ठोकावे लागले आहे. तुम्हाला कदाचित सर्व ठिकाणचे न्यायदान कक्ष बंद पाडून न्याय कुलूपबंद करायचे दिसत आहे, असे न्या. डी. वाय. चंद्रचुड आणि न्या. एस. नागेश्वर राव यांचा समावेश असलेल्या पीठाने सुनावले. न्यायमूर्ती नियुक्त्या रखडण्यामागे ‘मेमोरेंडम आॅफ प्रोसिजर’ला (एमओपी) अंतिम रूप न दिले जाणे हे एक कारण असल्याचे रोहतगी यांनी सांगितल्यानंतर न्यायालयाचा पारा चढला. या कारणास्तव नियुक्त्या थांबविल्या जाणार नाहीत. प्रसंगी जुन्या एमओपीच्या आधारे नियुक्त्या करता येऊ शकतील, असे विधी मंत्रालयाने मान्य केले आहे. त्यामुळे तुम्ही नव्या एमओपीशिवाय न्यायमूर्तींची प्रक्रिया पूर्ण करण्यास बांधील आहात’, असे न्यायालयाने ऐकवले. कॉलेजियमने उच्च न्यायालयांतील न्यायमूर्ती पदांसाठी शिफारस केलेल्या ७७ नावांपैकी केवळ १८ नावांवर आतापर्यंत शिक्कामोर्तब झाले आहे. तुम्हाला नावे देऊन नऊ महिने उलटले. तुम्ही ही नावे बुडाखाली ठेवली आहेत. तुम्ही कशाची प्रतिक्षा करीत आहात? तुम्हाला व्यवस्थेत काही बदल हवा आहे की व्यवस्थेत क्रांती अपेक्षित आहे, असा खोचक सवाल करताना सरकार नियुक्त्या रोखू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. कार्यकारींच्या निष्क्रियतेने संस्था नाश पावते, असे निरीक्षण पीठाने नोंदविले. या प्रकरणाची सुनावणी ११ नोव्हेंबरपर्यंत लांबणीवर टाकली. तुम्ही ‘त्यांना’ बोलवा...अलाहाबाद उच्च न्यायालयासाठी कॉलेजियमने १८ नावांची शिफारस केली. सरकारने त्यातील आठ नावे निवडली आणि आता ते केवळ दोन जणांची नियुक्ती करू इच्छिते. आम्ही गेल्या ४ फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील फाईल पाठविली. त्याबाबत काय प्रगती झाली ते आम्हाला सांगा. वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि विधी व न्याय मंत्रालयांच्या सचिवांना पाचारण करू शकतो. तुम्ही त्यांना बोलवा. मला त्यांचे म्हणणे ऐकायचे आहे, असे सरन्यायाधीश म्हणाले. तथापि, निकालाच्या आदेशात त्यांनी हा मुद्दा समाविष्ट केला नाही.