शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

कार्बन डेटिंग म्हणजे काय? काळ कसा शोधला जातो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 07:56 IST

नश्वर असलेले शरीर नष्ट झाले की त्याचा विलय होऊ लागतो. म्हणूनच एखाद्या झाडाचा वा प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या शरीरातील कार्बनचे प्रमाण हळूहळू घटू लागते.

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात आहे. सध्या न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणात कथित शिवलिंगाची सत्यासत्यता तपासण्यासाठी न्यायालयाने कार्बन डेटिंग करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया काय आहे, कार्बट डेटिंग म्हणजे काय हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरते. 

या भूतलावर जे जे म्हणून सजीव अस्तित्वात आहेत, त्यांची शरीरे अनेक रसायनांपासून बनलेली असतात. किंबहुना अखिल विश्वातील वस्तू जशा अणुरेणूंपासून बनलेल्या असतात तद्वत त्यामध्ये विविध प्रकारची रसायने उपस्थित असतात. नश्वर असलेले शरीर नष्ट झाले की त्याचा विलय होऊ लागतो. म्हणूनच एखाद्या झाडाचा वा प्राण्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या शरीरातील कार्बनचे प्रमाण हळूहळू घटू लागते. त्या झाडाचा वा प्राण्याचा मृत्यू कधी झाला, या काळाचा हिशेब त्याच्या अवशेषांमध्ये उपस्थित कार्बनवरून काढता येतो. निर्जीव वस्तूंच्या बाबतीत मात्र असे होत नाही. परंतु, दगड-धातूंचा बांधकामात वापर करताना त्यांचा स्पर्श लाकूड, कपडे, दोरी यासारख्या वस्तूंशी झालेला असतो. 

या गोष्टींचे अंश त्या निर्जीव वस्तूंमध्ये सापडले तर त्या निर्जीव वस्तूचे वयोमान काढता येते. ज्ञानवापी मशिदीतील कथित शिवलिंगाचे वयोमान काढण्यासाठी नेमकी हीच पद्धत अवलंबली जाणार आहे. पुरातत्त्व खात्यात कार्बन डेटिंग प्रक्रियेचा सर्रास वापर केला जातो. भारतासारख्या खंडप्राय देशात अनेक प्राचीन मंदिरे तसेच वास्तू आहेत. त्यांचा मागोवा घेताना अनेक आश्चर्यकारक गोष्टी उजेडात येतात. तेव्हा त्यांचे वयोमान किती हे ठरविण्यासाठी कार्बन डेटिंगचा प्रामुख्याने वापर केला जातो. केवळ भारतातच नव्हे तर जगभरात वापरली जाणारी ही एक मान्यताप्राप्त पद्धत आहे. त्यातून इतिहासाची अनेक रहस्ये उलगडली आहेत. कार्बन डेटिंग पद्धतीमुळे सेंद्रिय पदार्थांचे ६० हजार वर्षांपर्यंतचे वय अचूकपणे मोजता येते.

कोणी शोधली ही पद्धती? अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक विलार्ड लिब्बी यांनी १९४० मध्ये कार्बन डेटिंगची पद्धत शोधून काढली. कार्बन डेटिंगमध्ये सी-१४ हे एक समस्थानिक असते. त्याचे निम्मे आयुष्य ५,७३० वर्षे असते.