अतिक्रमण हटविण्यासाठी काय केले
By admin | Updated: February 7, 2015 02:05 IST
हायकोर्टाची विचारणा : भोकारा नाल्याचे प्रकरण
अतिक्रमण हटविण्यासाठी काय केले
हायकोर्टाची विचारणा : भोकारा नाल्याचे प्रकरणनागपूर : भोकारा नाल्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी आतापर्यंत काय केले, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शासनाला करून यासंदर्भात १८ फेब्रुवारीपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात मोहन कारेमोरे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. तहसीलदार (ग्रामीण) शोभाराम मोटघरे यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, भोकारा नाल्याच्या ०.३७ हेक्टर जमिनीवर अतिक्रमण आढळून आले आहे. अतिक्रमित भागात दिवंगत माजी मंत्री श्रीकांत जिचकार यांची मुलगी मैत्रेयी व मुलगा याज्ञवल्क्य यांच्या नावाने १.०६ हेक्टर (सर्वे क्र. १०३-२) जागा आहे. संतकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, ताजकृपा सहकारी गृहनिर्माण संस्था, महालक्ष्मी सहकारी गृहनिर्माण संस्था, हिंद हॉटेल आदींच्या नावानेही भूखंड आहेत. भूमी अभिलेख (ग्रामीण) विभागाचे उपाधीक्षक, नायब तहसीलदार (ग्रामीण), महसूल निरीक्षक आदी अधिकाऱ्यांनी ६ जून २०१४ रोजी अतिक्रमणाची चौकशी केली होती.