शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीसाठी चांगले काय, ते संसदेने ठरवावे न्यायालयाच्या सक्रियतेवर भाष्य : सुप्रीम कोर्टाने आखली लक्ष्मणरेषा

By admin | Updated: February 18, 2015 23:53 IST

नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय

नवी दिल्ली : लोकशाहीला वाचविण्यासाठी चांगले काय आहे, त्यासंबंधी निर्णय संसदेवर सोडण्यात आला असल्याचे सांगत सवार्ेच्च न्यायालयाने लक्ष्मणरेषा घालून दिली आहे. न्यायालय
विधिपालिकेच्या क्षेत्रात पाऊल टाकू शकत नाही. निवडून आलेले सदस्य किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना मंत्री न बनविण्याबाबत निर्णय संसदेला घ्यायचा आहे, असे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या खंडपीठाने बुधवारी स्पष्ट केले.
न्यायालयीन सक्रियतेच्या नावावर आम्ही विधिपालिकेच्या क्षेत्रात पाऊल टाकायचे आहे काय, लक्ष्मणरेषा घालून देण्यात आली आहे, आम्ही ती ओलांडू शकतो काय? अधिकारांची विभागणी झाली आहे. उपरोक्त मुद्यावर लोकप्रतिनिधींना निर्णय घ्यायचा आहे. आता त्यांनी विधी आयोगाची शिफारस केली आहे. देश कसा चालवायचा हे त्यांना कळते. कोणत्या प्रकारचे लोक असायला हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळेच आम्ही त्यांच्या क्षेत्रात हस्तक्षेप करीत नाही, असेही न्या. दत्तू, ए.के.सिक्री आणि ए.के.मिश्रा यांच्या खंडपीठाने म्हटले.
लोकशाही वाचविण्यासाठी संसद सदस्य कोणत्या प्रकारचे लोक हवेत ते ठरवू शकतात. चांगले प्रशासन हा आमचा नव्हे तर त्यांचा निर्णय आहे. केवळ आरोप निश्चित झाले म्हणून एखाद्याला निवडणुकीत सहभागापासून रोखण्यात आल्यास त्याच्यावर कायमचा कलंक लागला जाऊ शकतो, याबाबत खंडपीठाने सावधगिरीचा इशाराही दिला.
-------------------
न्यायालयाच्या मर्यादा अधोरेखित
गंभीर गुन्ह्यांचे आरोप असलेल्या लोकप्रतिनिधींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येऊ नये अशी विनंती एका जनहित याचिकेत करण्यात आली होती. याचिकाकर्त्याची अस्वस्थता आम्ही समजू शकतो मात्र केवळ आरोप निश्चित झाल्याच्या आधारावर आम्ही एखाद्याला अपात्र ठरवू शकत नाही किंवा निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याला अटकाव घालू शकत नाही. एखाद्याला दोषी ठरविले जात नाही तोपर्यंत त्याला निरपराध मानले जाते. आरोप असलेल्यांना निवडणुकीत सहभागी होण्यापासून रोखले जावे काय? प्रथमदर्शनी ते भावणारे असले तरी वैधानिक तरतुदी किंवा घटना तसे करण्याला मंजुरी देत नाही. एखाद्याचा दोष सिद्ध होईपर्यंत तो निरपराध असतो त्यामुळे तोपर्यंत तो पूर्वग्रहच मानला जातो. निवडणुकीसंबंधी विविध मुद्यांबाबत कायदे पाहता आम्ही मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्याच्या स्थितीत नाही, असेही खंडपीठाने नमूद केले.