शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
2
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
3
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
4
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
5
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
6
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
7
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
8
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
9
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
10
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
11
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
12
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
13
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
14
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
15
Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
16
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
17
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
18
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
19
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
20
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका

1 एप्रिलपासून काय महाग? काय स्वस्त?

By admin | Updated: March 30, 2017 13:39 IST

नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहेत.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 30 - नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच येत्या १ एप्रिलपासून आपल्या गरजेच्या आणि ऐशोआरामाच्या वस्तू महाग होणार आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पात मांडण्यात आल्याप्रमाणे सर्वप्रकरचे टॅक्स एक एप्रिलपासून लागू होणार आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या गरजेच्या काही वस्तू महाग होणार आहेत. यामध्ये पान-मसाला, सिगारेट, चांदीच्या वस्तू, हार्डवेअर, स्लिव्हर फॉईल, चांदीचे आभूषणे, स्टीलचे सामान, आणि स्मार्टफोन यांचा समावेश आहे. तर काही वस्तू स्वत होतील. यामध्ये  नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौर उर्जा बॅटरी आणि पॅनल यांचा समावेश आहे. जाणून घेऊत काय स्वत होणार? आणि काय महाग? 

हे महागणार - - केंद्रीय उत्पादन शुल्क आणि सीमा शुल्क वाढल्यानंतर तंबाखू असणाऱ्या पान-मसाला आणि गुटख्यावर उत्पादन शुल्क 10 टक्क्यांवरून 12 टक्के करण्यात येणार आहे. त्यामुळे शौकीनांना आता है शौक महाग पडणार आहे. सिगारेटवर उत्पादन शुल्क 215 रुपये प्रति हजारवरून वाढवून 311 रुपये प्रति हजार होणार आहे. - एक एप्रिलपासून हेल्थ आणि कार इन्शूरन्स महाग होणार आहे.- मोबाईल फोन तयार करण्यासाठी लागणारे प्रिटेड सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात येणार आहे. यापूर्वी सर्किट बोर्डवर सीमा शुल्क लावण्यात आलेला नव्हता. त्यामुळे आता मोबाईल फोन महाग होणार आहेत. - एलईडी ब्लब तयार करण्यासाठी लागणाऱ्या सामुग्रीवर सीमा शुल्क आणि ६ टक्के प्रतिपूर्ती शुल्क लावण्यात येणार आहे. त्यामुळे एलईडी बल्ब महाग होणार आहे.- अ‍ॅल्यूमिनियम ३० टक्के आयात शुल्क लावण्यात आला आहे. त्यामुळे या संदर्भात सर्व पदार्थ महाग होणार आहे. - कार, मोटारसायकल आणि कमर्शियल वाहनांच्या विमा एक एप्रिलपासून महाग होणार आहे. यांच्या दरात 50 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.हे स्वस्त होणार - रेल्वे तिकीट खरेदी, स्वस्त घर, मध्यम वर्गाला टॅक्समध्ये सूट, भूमी अधिग्रहणाची नुकसान भरपाई टॅक्स फ्री, लेदर सामान, नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौर उर्जा बॅटरी आणि पॅनल, पवन चक्की, आरओ, पॉईंट ऑफ सेल मशीन, पार्सल स्वस्त होणार आहे.