शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
2
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
3
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
4
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
5
Raksha Bandhan 2025 SIP Gift: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
6
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
7
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
8
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
9
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
10
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
11
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
12
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
13
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
14
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
15
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
16
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
17
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
18
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
19
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
20
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?

रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते? एकनाथ खडसेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य

By admin | Updated: December 30, 2014 00:10 IST

रघुराम राजन यांची केली पाठराखण

रघुराम राजन यांची केली पाठराखणनाशिक : गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त वक्तव्य करून वादाच्या भोवर्‍यात सापडलेले महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी अजून एकदा वादाला निमंत्रण देत शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांना अर्थकारणातील काय कळते,अशी खोचक टीका केली आहे. तसेच शेतकर्‍यांबाबत वास्तव वक्तव्य केल्याचे सांगत रिझर्व्ह बॅँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांची पाठराखण केली आहे.नाशिक सिटीझम फोरमच्या कार्यक्रमासाठी नाशिकला आले असता शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सुरू असलेल्या शेतकरी आत्महत्त्यांवर शंभर टक्के उपाय सध्या तरी सापडत नसल्याचे सांगत त्यांनी रिझर्व्ह बॅँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी शेतकर्‍यांसाठी केली जाणारी कर्जमाफीविषयी केलेल्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. राजन अर्थतज्ज्ञ असून, त्यांचा आर्थिक अभ्यास असल्याने त्यांनी ते वक्तव्य केल्याचे सांगितले. राजन यांच्या वक्तव्यास शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील यांनी विरोध करीत त्याविरोधात न्यायालयात जाणार असल्याच्या विधानबाबत एकनाथ खडसे यांना विचारले असता ते म्हणाले, पाटील यांना शेतीचे कळत असले तरी, आर्थिक ज्ञान नसल्याचे खडसे यांनी यावेळी सांगितले. द्राक्षबागा व फळबागांचे नुकसान झाल्याने त्यांना शासनाने दिलेली मदत तोकडी आहे. फळबागा उत्पादकांना उभे राहण्यासाठी जास्तीत जास्त निधी शासन देणार असून, त्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आलेली आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या रोखण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू असल्या तरी, काही केल्या हे आत्महत्त्यांचे सत्र थांबत नाही. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन शेतकर्‍यांचे प्रबोधन केल्यास आत्महत्त्या थांबू शकतील. त्याचप्रमाणे राज्यात कृषी क्षेत्रासाठी स्वतंत्र कृषी बजेट मांडणार काय? अशी विचारणा केली असता त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प तयार करतानाच ओढाताण करावी लागणार आहे. त्यामुळे कृषीसाठी वेगळा वेगळा अर्थसंकल्प तयार करणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)इन्फो..निर्णय मानेंचा, शासन अंधारातकृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील आडत बंद करण्याचा निर्णय कृषिमंत्री अथवा सहकारमंत्र्यांना माहिती न देताच परस्पर स्वत:ची प्रतिमा उंचावण्यासाठी पणन संचालक सुभाष माने यांनी घेतल्याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी यावेळी केला. वस्तुत: निर्णय शेतकरी हिताचा असला तरी आम्हाला त्याची कल्पना नसल्याने व्यापारी, आडतदारांना उत्तरे द्यावी लागली. लवकरच या निर्णयाला दिलेली स्थगिती उठविण्यात येईल, असे खडसे यांनी सांगितले.