शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

चंद्रावर भूकंप होतात काय?

By admin | Updated: June 14, 2015 23:57 IST

आजवरच्या भूकंपाने पृथ्वी तलावर घडलेल्या विध्वंसाने प्रचंड जीवित हानीसोबत वित्तीयहानी झाल्याच्या खुणा आजही दिसतात.

नवी दिल्ली : आजवरच्या भूकंपाने पृथ्वी तलावर घडलेल्या विध्वंसाने प्रचंड जीवित हानीसोबत वित्तीयहानी झाल्याच्या खुणा आजही दिसतात. अलीकडेच नेपाळमधील विध्वंसक भूकंपाने अवघे जग हादरले होते. यात जवळपास १० हजारांहून लोक मृत्युमुखी पडले. एवढेच नाही तर नेपाळचा नकाशाही काहीसा बदलला. जगाच्या पाठीवर कोठे ना कोठे भूकंप होत असतात. पृथ्वीचा उपग्रह असलेल्या चंद्रावरही भूकंप होतात काय? या सवालावर भारताच्या चंद्रयान-१ मार्फत मिळालेल्या डाटाच्या आधारे उत्तर मिळाले असून चंद्राच्या पृष्ठभागात वेगवान हालचाली होत असल्याचा निष्कर्ष हाती आला आहे. टेक्टोनिक प्लेटस्च्या (भूसांरचनिक स्तर) आपसातील घर्षणामुळे भूकंपासारखी आपत्ती कोसळते, असे जवाहर नेहरू विद्यापीठातील भू-शास्त्र, दूरसंवेदी व अंतराळशास्त्र विभागाचे संयोजक प्रो. सौमित्र मुखर्जी यांनी म्हटले आहे.‘चंद्रयान-१’ वरून मिळालेल्या डाटाचे विश्लेषण केले असता त्यात आढळले की, टेक्टोनिक प्लेटस्च्या आपसातील घर्षणामुळे भूकंपासारखी आपत्ती कोसळते. चंद्रयानातील अरुंद कोनी कॅमेरा व चंद्रावरील हालचाली टिपणाऱ्या कक्षीय कॅमेऱ्यातून घेण्यात आलेल्या छायाचित्रांतून चंद्रावरही भूकंपासारख्या घटना घडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या माहितीचे शास्त्रीयदृष्ट्या विश्लेषण करण्याकामी त्यांना प्रियदर्शनी सिंह यांनीही सहकार्य केले असून, यासंबंधीचे अनेक लेख आंतरराष्ट्रीयस्तरीय विज्ञानविषयक नियतकालिकात प्रकाशितही झाले आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)