शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कॅबमध्ये लोक काय काय विसरतात

By admin | Updated: April 10, 2017 00:46 IST

तुम्ही अनेक विसराळू लोकांबद्दल ऐकले असेल. मात्र, कोणी १५ लाख रुपयांचा धनादेश कॅबमध्ये विसरू शकतो काय

तुम्ही अनेक विसराळू लोकांबद्दल ऐकले असेल. मात्र, कोणी १५ लाख रुपयांचा धनादेश कॅबमध्ये विसरू शकतो काय? होय, असे बहाद्दरही आहेत. एका कॅब सेवापुरवठादार कंपनीने देशभरात केलेल्या सर्व्हेत ही बाब समोर आली. या कंपनीने ‘लॉस्ट अ‍ॅण्ड फाऊंड इंडिया इंडेक्स’ या नावाने यादी जाहीर केली असून, त्यात लोक कॅबमध्ये काय काय विसरतात याची माहिती देण्यात आली आहे. या यादीत काही नेहमी विसरणाऱ्या वस्तूंचा समावेश आहे. मात्र, काही लोक टॅक्सीत अशा काही गोष्टी विसरले आहेत जे ऐकून तुम्हाला खरे वाटणार नाही. मोबाईल फोन, फोनचे चार्जर, चावी, पाकीट, पर्स किंवा बॅग, चष्मा या गोष्टी लोकांकडून नेहमीच विसरून राहतात. मात्र, एका बहाद्दराचा १५ लाख रुपयांचा चेक विसरून राहिला, तर दुसरा लाडक्या कुत्र्यालाच कॅबमध्ये विसरला. कॅबमध्ये विसरून राहिलेल्या वस्तूत महागडे घड्याळ, महागडे बूट, की-बोर्ड, दारूच्या बाटल्या, क्रिकेट बॅट, किराणा सामानाची पिशवी तसेच पानकोबीचाही समावेश आहे.कॅबमध्ये वस्तू विसरण्यात बंगळुरूचे लोक सर्वात पुढे आहेत. त्यानंतर दिल्लीकरांचा क्रमांक लागतो. विसराळुपणात मुंबई तिसऱ्या, हैदराबाद चौथ्या, तर कोलकाता पाचव्या क्रमांकावर आहे. लोक सर्वाधिक वस्तू शनिवारी आणि रविवारी टॅक्सीत विसरतात. कॅबमध्ये वस्तू विसरल्याच्या सर्वाधिक घटना ३१ डिसेंबर रोजी घडल्या. ३१ डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस. जिकडेतिकडे उत्सवाचे वातावरण. अशावेळी वस्तू विसरणे स्वाभाविक आहे. त्यामुळे आता कॅब केल्यानंतर उतरताना सर्व वस्तू घेतल्या ना, याची खात्री करून घ्या.