शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांत काय केले?’

By admin | Updated: August 30, 2014 02:41 IST

पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उत्तर मागितले आहे

नवी दिल्ली : पोलीस सुधारणांबाबत आठ वर्षांपूर्वी दिलेल्या निर्णयावर आतापर्यंत काय केले, असा सवाल करीत सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारांना उत्तर मागितले आहे. तपासाच्या प्रक्रियेला कायदा व सुव्यवस्थेपासून वेगळे करणे हेच पोलीस सुधारणेचे मूळ तत्त्व आहे, असेही स्पष्ट केले.पोलीस सुधारणेबाबत अनेक मुद्दे समाविष्ट असून, उपरोक्त मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे, असे न्या. तीरथसिंग ठाकूर यांच्या खंडपीठाने म्हटले. पोलीस अधिकाऱ्यांचा निश्चित कार्यकाळ, पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती, बदल्या तसेच पोलीस प्रतिष्ठान मंडळांची स्थापना यांसारख्या मुद्यांवर नंतर विचार केला जाईल, असे खंडपीठाने म्हटले. उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक प्रकाशसिंग यांच्या याचिकेवर न्यायालयाने राज्यांना विविध प्रकारचे निर्देश दिले होते.दुस-यांदा मागितले उत्तर...पोलीस सुधारणेबाबत २००६ मध्ये निर्णय देण्यात आला होता, मात्र राज्यांनी त्यावर अंमलबजावणी केली नाही.गंभीर गुन्ह्यांसाठी वेगळे विशेष पोलीस दल स्थापन करावे, असेही बजावत सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी ११ एप्रिल रोजी सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना नोटीस पाठवून अंमलबजावणीबाबत उत्तर मागितले होते. राज्य सरकारांनी सुरक्षा आयोग स्थापन करावा, पोलीस प्रमुखांच्या नियुक्तीबाबत पारदर्शक प्रक्रियेचा अवलंब, त्यांना निश्चित कार्यकाळ ठरवून देणे, कायदा व सुव्यवस्थेच्या मुद्यापासून तपास कार्य वेगळे करणे, जनतेच्या आशा-आकांक्षेचे प्रतिबिंब दिसावे यासाठी नवा पोलीस कायदा आणणे, यासारख्या निर्देशांच्या अंमलबजावणीची सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा दखल घेतली आहे.