पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वीच तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसणं सुरूच आहे. आता, ममता सरकारमधील मंत्री आणि माजी क्रिकेटर लक्ष्मी रतन शुक्ला यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला. यानंतर ते पक्षातून बाहेर पडतील अशा चर्चा राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. परंतु पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. तसंच त्यांनी शुक्ला यांच्या राजीनाम्याबाबत प्रतिक्रियाही दिली आहे. "कोणीही आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतं," असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. "त्यांना खेळासाठी आपला अधिक वेळ द्यायचा आहे. ते आमदार म्हणून कायम राहतील. आपला राजीनामा नकारात्मक पद्धतीनं घेतला जाऊ नये," असं त्यांनी राजीनाम्याच्या पत्रात लिहिलं असल्याचं ममता बॅनर्जी यांनी नमूद केलं.
मंत्री लक्ष्मी रतन शुक्लांच्या राजीनाम्यावर ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया; म्हणाल्या...
By जयदीप दाभोळकर | Updated: January 5, 2021 17:59 IST