शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

West Bengal Election: प्रचारावर 24 तासांची बंदी; कोलकात्यातील गांधी पुतळ्यासमोर ममतांचे धरणे आंदोलन, असे आहे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 13:29 IST

"पश्चिम बंगालमध्ये एकदा जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो तो परत येत नाही, हा येथील इतिहास राहिला आहे. ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही." (CM Mamata Banerjee)

ठळक मुद्देनिवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना 24 तासांसाठी निवडणूक प्रचार करण्यास बंदी कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ ममतांनी धरणे दिले आहे.निवडणूक आयोगाने ममतांच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यावरून ही कारवाई केली आहे.

कोलकाता - निवडणूक आयोगाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना 24 तासांसाठी निवडणूक प्रचार करण्यास बंदी घातली आहे. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोलकात्यातील गांधी पुतळ्याजवळ त्यांनी धरणे दिले आहे. निवडणूक आयोगाने ममतांच्या हिंदू-मुस्लीम वक्तव्यावरून ही कारवाई केली आहे. (West Bengal CM Mamata banerjee sits on dharna at gandhi murti over EC imposed ban election campaign)

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान ममतांनी मुस्लीम मतांसंदर्भात भाष्य केले होते. 8 एप्रिलला हुगळी येथे ममता बॅनर्जी यांनी निवडणूक प्रचार सभेदरम्यान मुस्लीम मतांचे विभाजन होऊ नये अशा आशयाचे भाष्य केले होते. यावरूनच निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारासाठी बंदी घातली होती. यामुळे ममतांना आता 12 एप्रिलच्या रात्री 8 वाजल्यापासून ते 13 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपर्यंत, असे 24 तास निवडणूक प्रचार करता येणार नाही.

West Bengal Assembly Election 2021 : "बंगालच्या निवडणुका हरले तर मोदी-शहा राजीनामा देणार का?", यशवंत सिन्हांचा हल्लाबोल

ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक प्रचारावर बंदी घालण्यात आल्यानंतर टीएमसी खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर आम्ही निवडणूक जिंकत आहोत, हे भाजपला माहीत आहे. यामुळेच ममतांवर निवडणूक आयोगाकडून कारवाई होत आहे, असेही डेरेक ओ ब्रायन म्हणाले.

भाजपच्या जागांचे शतक, नंदीग्रामच्या लोकांनी ममतांना आऊट केले -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. चार टप्प्यांच्या मतदानानंतर तृणमूलला त्यांचा पराभव होत असल्याचे कळले आहे. आतापर्यंत झालेल्या मतदानात जनतेने इतके चौकार-षटकार लगावले आहेत की, भाजपच्या जागांचे शतक झाले आहे. तर नंदीग्रामच्या लोकांनी ममतांना आऊट केले आहे, या शब्दांत मोदी यांनी ममतांवर टीका केली. 

ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही -मां, माटी आणि मानुषचे आश्वासन देत ममता बॅनर्जी १० वर्षांअगोदर सत्तेत आल्या होत्या. मात्र, त्यांनी महिलांना त्रास देणे, मातीला लुटणे आणि मनुष्यांचा रक्तपात हा मार्ग निवडला. तोडा फोडा व राज्य करा हीच त्यांची भूमिका राहिली. निवडणुकीतील पराभव दिसत असल्याने त्यांचा क्रोध व अस्वस्थता वाढत आहे. भाचा अभिषेक बॅनर्जीला पक्षाची धुरा देण्याचा त्यांचा मानस धुळीला मिळाला आहे, असे मोदी म्हणाले. पश्चिम बंगालमध्ये एकदा जो पक्ष सत्तेतून बाहेर जातो तो परत येत नाही, हा येथील इतिहास राहिला आहे. ममता एकदा पराभूत झाल्या, तर परत कधी येऊ शकणार नाही, असा दावा पंतप्रधानांनी केला.