शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करायला गेला, मुर्खपणामुळे जीव वाचला

By admin | Updated: April 25, 2017 18:01 IST

मुर्खपणामुळे एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण मुर्खपणामुळे कुणाचा जीव वाचल्याचं तुम्ही ऐकलंय का? पण मुर्खपणामुळे

 ऑनलाइन लोकमत

जयपूर, दि. 25 - मुर्खपणामुळे एखाद्याचा जीव गेल्याचं तुम्ही ऐकलं असेल, पण मुर्खपणामुळे कुणाचा जीव वाचल्याचं तुम्ही ऐकलंय का? पण मुर्खपणामुळे आत्महत्या करण्यास निघालेल्या एका तरुणाचा जीव वाचल्याची घटना जयपूरमध्ये घडली आहे.  येथील एक तरुण आत्महत्या करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर झोपला. त्यादरम्यान एक ट्रेनही त्या ट्रॅकवरून धडधडत निघून गेली. मात्र या तरुणाला किरकोळ जखमांव्यतिरिक्त काहीही झाले नाही. तो जिवंत असल्याचे पाहून तेथे उपस्थित असलेल्या सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. 
याबाबत सविस्त हकीकत अशी, अजमेर-किशनगंज एक्सप्रेसचा ड्रायव्हर दौसा स्टेशमनवरून ट्रेन नेत होता. सुमारे 5 किमी अंतर पार केल्यावर त्याला ट्रॅकवर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसले. त्याला वाचवण्यासाठी ड्रायव्हरने वारंवार हॉर्न वाजवला, पण ट्रॅकवर उभ्या असलेल्या तरुणाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर ड्रायव्हरने ब्रेक लावून ट्रेन थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ट्रेन त्याच्यावरून निघून गेली.   या गोंधळात तो तरुण ट्रॅकच्या मध्येच झोपला. त्यामुळे त्याच्या जिवावर बेतले नाही. 
 या घटनेनंतर संबंधित तरुणार रेल्वे कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. नंतर त्याला जीआरपीच्या जवानांनी उपचारांसाठी रुग्णालयात नेले. दरम्यान आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव कमलेश बैरवा असून, तो दौसापासून जवळ असलेल्या एका गावातील रहिवासी असल्याची माहिती त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. मात्र आपण आत्महत्या करण्यासाठी ट्रॅकवर गेल्याचा दावा त्या तरुणाने फेटाळून लावला आहे. आपण रेल्वे रुळ ओलांडत असताना ही दुर्घटना घडल्याचे त्याने सांगितले.