शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या करायला गेला आणि मगरींच्या तावडीत सापडला...

By admin | Updated: October 7, 2015 12:32 IST

आत्महत्या करण्यासाठी तलावात उडी मारलेला एका तरूण मगरींच्या तावडीत सापडल्याची धक्कादायक घटना बडोद्यात घडली.

ऑनलाइन लोकमत
बडोदा, दि. ७ - एखादी व्यक्ती मृत्यूच्या दाढेतून परत आल्याचे आपण अनेकवेळा ऐकतो, पण तलावात पडून मगरींच्या तावडीत सापडूनही जिवंत परतलेला एक तरूण पाहून गुजरातमधील लोकांना या म्हणीचा प्रत्यक्षात अनुभव आला. मानसिक संतुलन बिघडलेला मुकेशने ( वय २५) मंगळवारी आत्महत्या करण्यासाठी विश्वामित्री नदीत उडी मारली खरी, मात्र तेथे तो अर्धा डझन मगरींच्या तावडीत सापडला.
सात ते आठ मगरींच्या गराड्यात अडकलेला मुकेश मदतीसाठी ओरडू लागला. त्याचा आवाज ऐकून जवळच काम करणा-या काही नागरिकांनी नदीच्या दिशेने धाव घेतली असता त्यांना नदीत पडलेला मुकेश दिसला, काही मगरींनी त्याला जबड्यात पकडले होते, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र सुदैवाने मगरींनी त्याला ओढून पाण्याखाली न नेल्याने त्याचा जीव वाचला. मगरींचे लक्ष हटवण्यासाठी लोकांनी आरडाओरड सुरू केली व काही जण त्यांना दगडही मारू लागले. जवळपास १५ मिनिटांच्या संघर्षानंतर नागरिकांना मुकेशला वाचवण्यात यश आले.  
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने नदीकाठी धाव घेतली आणि त्यांनी मुकेशची मगरींच्या तावडीतून सुटका केली. या घटनेत मुकेशचा जीव वाचला असला तरी मगरींनी जबड्यात पकडल्यामुळे त्याच्या शरीरावर गंभीर व खोल जखमा झाल्या, तसेच शरीरातून भरपूर रक्तस्त्रावही झाला.  त्याला उपचारांसाठी तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले.