शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

त्र्यंबकेश्वर मंदिरालगत साकारतेय सुसज्ज दर्शनवारी

By admin | Updated: July 15, 2015 23:12 IST

भाग्यश्री मुळे

भाग्यश्री मुळे
त्र्यंबकेश्वर : सिंहस्थ कुंभपर्वास प्रारंभ झाला असून, देशाच्या कानाकोपर्‍यातून भाविक मोठ्या संख्येने त्र्यंबकला भेट देत आहे. कुशावर्त तीर्थावर स्नान करणे, ब्रšागिरी, गंगाद्वार, त्र्यंबकेश्वर मंदिर आदि ठिकाणांना भेटी देणे असा शिरस्ता भाविक राबवित आहेत. मंदिरात होणार्‍या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी त्र्यंबकेश्वर मंदिरालगत सुसज्ज दर्शनबारी तयार होत आहे. एक एकर जागेत सीमेंटचे वॉलकंपाऊंड, पत्र्यांचे शेड, वीज, पाणी आदि सुविधांयुक्त दर्शनबारीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ध्वजारोहण सोहळ्यानंतर कुंभमेळा सुरू झाला असल्याने आणि शाहीपर्वणी दरम्यान होणार्‍या लाखोंच्या गर्दीत स्नान, दर्शन अशक्य ठरू शकण्याची शक्यता असल्याने मोठ्या प्रमाणात भाविक त्र्यंबकला येऊ लागले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या बाहेर लांब लांब रांगा लागत असल्याने आणि पाऊस, थंडी यामुळे भाविकांचे हाल होत असल्याने मंदिराच्या पूर्व दरवाजालगतच्या एक ते दीड एकर जागेचे सपाटीकरण करून तेथे वॉटरप्रूफ मंडप घालून, त्यावर पत्रे बसवून दर्शनबारी केली जात आहे. अर्ध्या दर्शनबारीचे काम पूर्ण झाले असून, सिंहस्थ काळात भाविकांची गैरसोय यामुळे टळणार आहे. या दर्शनबारीत एकाचवेळी एक ते दीड हजार लोक नंबर लावून थांबू शकतील, अशी व्यवस्था होणार आहे. ही दर्शनबारी सुरू झाल्यावर त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून दर्शनाची रांग बंद केली जाणार आहे.
पुरातत्व खात्याच्या निर्देशनानुसार मंदिर परिसरातील १00 फूट जागेत कोणतेही बांधकाम करण्यास परवानगी नसल्याने आणि त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मागील बाजूस गोदावरी नदी वाहत असल्याने नदीकिनारी बांधकाम करणे योग्य ठरत असल्याने ही दर्शनबारी सिंहस्थ कुंभमेळ्यानंतर सहा महिन्यांत काढून टाकण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या जरी सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांची गैरसोय टळणार असली तरी नंतर मात्र ऊन, पाऊस, वारा सोसातच भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन घ्यावे लागणार आहे.
कोट
एक ऑगस्टपर्यंत दर्शनबारीचे काम पूर्ण होईल. जवळपास सहा महिन्यांसाठी ही दर्शनबारी येथेच असण्याची शक्यता आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट दर्शनबारीत सर्व सोयीसुविधा देणार आहे.
- चंदर वाघिरे, साईश्रद्धा मंडप, नाशिक