शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

योगगुरू मुमताज अली यांच्या आशा यात्रेचे हिवरेबाजार येथे स्वागत

By admin | Updated: July 16, 2015 15:56 IST

हिवरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.

हिवरेबाजार : शांती व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी पदयात्रा करणारे केरळमधील त्रिवेंद्रम येथील योगगुरू श्री एम. ऊर्फ मुमताज अली यांचे आदर्शगाव हिवरेबाजार येथे फुलांचा वर्षाव करत विद्यार्थी, ग्रामस्थ तसेच आदर्शगाव संकल्पनेचे पोपटराव पवार यांनी भव्य स्वागत केले.
मुमताज अली यांची पदयात्रा सुमारे ७५०० किमी व ११ राज्यामधून जाणार आहे. या यात्रेचे गुरुवारी सकाळी ११ वाजता हिवरेबाजार येथे आगमन झाले. विद्यालयाच्या विद्यार्थिनींचे शालेय पथक तसेच ग्रामस्थांनी टाळांचा गजर करत या पदयात्रेची गावातून भव्य अशी मिरवणूक काढली. योगगुरू अली यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनी १२ जानेवारी २०१५ पासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा दररोज २० ते २५ कि.मी. अंतर चालते. ११ राज्ये, ८६ जिल्हे, ४५० गावामधून सुमारे ५०० दिवस या पदयात्रेचा प्रवास आहे. सर्व जाती धर्मातील लोकांशी संवाद साधून एकात्मतेचा संदेश देणे हा या पदयात्रेचा मुख्य उद्देश आहे. या यात्रेतील भक्तांनी दिवसभर हिवरेबाजार गावाची पाहणी केली. गावकर्‍यांनी केलेले स्वागत, गावाचे व्यवस्थापन, स्वच्छता, पर्यावरण पाहून अली यांनी गावकर्‍यांचे कौतुक केले. सायंकाळी अली यांनी गावकर्‍यांशी संवाद साधून एकात्मतेविषयी मार्गदर्शन केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (वार्ताहर)

फोटो...
कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर अशी ७५०० कि.मी. पदयात्रा करणारे योगगुरू मुमताज अली यांच्या पदयात्रेचे हिवरेबाजार येथे भव्य स्वागत करण्यात आले. (नागेश सोनवणे)

(फोटो- १६ हिवरेबाजार)