शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

जामनेरात धनगर आरक्षण रथ यात्रेचे स्वागत

By admin | Updated: May 17, 2016 01:03 IST

जामनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.

जामनेर- महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीच्यावतीने संपूर्ण राज्यात रथ यात्रा काढण्यात येत असून हा रथ गुरुवारी सकाळी ११ वाजता न.पा.चौकात आला. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत जोरवाड (ता.कौटीमहाकाळ) येथून ही रथ यात्रा सुरू झाली आहे. या रथयात्रेचा समारोप ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म गावी चौंडी ता.जामखेड येथे जयंती दिनी होणार आहे. तब्बल ४८ दिवसात ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्‘ात जाणार आहे. न.पा.चौकात अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन नगराध्यक्ष सौ.साधना महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. नगरसेवक छगन झाल्टे, गटनेते महद्र बाविस्कर, जितू नेमाडे, समाधान सुशिर, दीपक कचरे, सुनील नेमाडे, तालुका अध्यक्ष डी.डी.पाटील, गणेश् मंडलिक, रवी देशमुख, बारकू जाणे, व्ही.डी.पाटील, मनोहर हडप, पारखे साहेब आदी यावेळी उपस्थित होते.
कॅप्शन- रथाचे स्वागत करताना नगराध्यक्ष साधना महाजन व आदी मान्यवर.

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुखपदी ॲड.शरद माळी
फोटो- तालुका प्रमुख, शहर प्रमुख
धरणगाव- शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या तालुका प्रमुखपदी ॲड.शरद रामदास माळी यांची तर शहर प्रमुखपदी शैलेंद्रसिंग गुलाबसिंग चंदेल यांची नियुक्ती कक्षाचे राज्यचिटणीस ॲड.अरुण जगताप यांनी केली आहे शिवसेना भवन मुंबई येथे त्यांच्या समवेत जिल्हाप्रमुख गजानन मालपुरे हे उपस्थित होते.
ॲड.माळी व चंदेल यांच्या नियुक्तीबद्दल उपनेते आ.गुलाबराव पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, उपजिल्हाप्रमुख सलीम पटेल, कक्ष जिल्हा संपर्क प्रमुख समाधान पाटील, शहर प्रमुख राजेेंद्र महाजन, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख उमेश चौधरी व शिवसैनिकांनी सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

जामनेर तालुक्यातून शेंदुर्णीतील विद्यार्थी नवोदयासाठी सर्वाधिक
शेंदुर्णी : यशाची परंपरा कायम
शेंदुर्णी (जामनेर)- जानेवारी २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेत शेंदुर्णी येथील सरस्वती विद्यालयाचे पाच विद्यार्थी तर आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयाचे २ विद्यार्थी असे एकूण ७ विद्यार्थ्यांची नवोदय विद्यालयासाठी निवड करण्यात आले. जामनेर तालुक्यातून १२ विद्यार्थ्यांची संध्या आहे.
गौरव किरण चौधरी, माधव रजनीकांत शुक्ला, प्रज्वल मनोज चौधरी, श्रेयस वासुदेव गुजर, सोहील गनी तडवी आदी विद्यार्थी हे सरस्वती मादध्यमिक विद्यालयाचे आहे. यांना मार्गदर्शन निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी आर.एस.जैन यांनी केले. संस्थेच्या चेअरमन श्रीमती डॉ.कौमुदिनी साने, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील, अजय सूर्यवंशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
आचार्य गजाननराव गरुड माध्यमिक विद्यालयातून प्रियदर्शनी महेश भदाणे व यशवंत प्रमोद रावल्रसर या दोन विद्यार्थ्यांची नवोदयासाठी निवड झाली. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, जि.प.सदस्य संजय गरुड, सहसचिव पी.एस.पाटील, दीपक गरुड, सागरमल जैन, प्राचार्य बी.जी.मांडवडे यांनी अभिनंदन केले. (वार्ताहर)