शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
2
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
3
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
4
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
5
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
6
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
7
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
8
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
9
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
10
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
11
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
12
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
13
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
14
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
15
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
16
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
17
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
18
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
19
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या कथित लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे

"आपका स्वागत है मेरे दोस्त", मोदींचं इस्त्रायलमध्ये हिंदीत स्वागत

By admin | Updated: July 4, 2017 20:02 IST

तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मोदी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले.

ऑनलाइन लोकमत
जेरुसलेम, दि. 4 - तीन दिवसांच्या इस्त्रायल दौ-यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6 वाजता मोदी बेन गुरियन विमानतळावर पोहोचले.  इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी प्रोटोकॉल तोडून विमातळावर मोदींचं स्वागत केलं. नेत्यानाहू यांनी मोदींचं स्वागत करताना हात जोडून त्यांना नमस्ते केलं तर आपका स्वागत है मेरे दोस्त असं हिंदीत ते म्हणाले.  
 
इस्रायलला भारतीय संस्कृती , इतिहास , लोकशाही याविषयी प्रेम आहे आणि हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारत आणि इस्रायली लोकांची गुणवत्ता हा दोन्ही देशांमधील समान धागा असून त्यामुळे आमची भागीदारी यशस्वी ठरेल, असा विश्वास नेत्यानाहू यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपल्या भाषणाची सुरूवात हिब्रू भाषेत केली. मी इस्रायलमधील भारतीयांशी आणि भारतीय वंशाच्या ज्यू लोकांशी संवाद साधण्यासाठी उत्सुक आहे. भारत आणि इस्रायल हे दोन्ही देश नागरिकांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि सुरक्षेसाठी भागीदारी करत आहेत. दोन्ही देश आपापल्या नागरिकांना दहशवादाच्या धोक्यापासून सुरक्षित ठेवण्यासाठी एकमेकांना सहकार्य करत आहेत. या क्षेत्रांतील भागीदारी अधिक घट्ट करण्याच्यादृष्टीने मी आणि पंतप्रधान बिनामीन नेत्यानाहू चर्चा करू, असे मोदींना सांगितले.
 
नरेंद्र मोदी हे इस्रायलला जाणारे पहिलेच भारतीय पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या दौऱ्याबाबत इस्रायलमध्ये कमालीची उत्सुकता आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी यांची योग्य प्रकारे सुरक्षा आणि इतर व्यवस्था योग्यप्रकारे होण्याची काळजी तेथे घेतली जात आहे. इस्रायलच्या माध्यमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सर्वात महत्त्वाचे पंतप्रधान म्हणून नावाजले आहे. जेरुसलेम पोस्टच्या वृत्तानुसार इस्रायली अधिकाऱ्यांसाठी डोनल्ड ट्रम्प यांच्या भेटीपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अधिक त्रासदायक ठरणारी आहे. पण ट्रम्प यांच्यांभेटीच्या तुलनेत मोदी यांच्या भेटीबाबत बंधने कमी आहेत.मोदी यांच्या भेटीसाठी किंग डेव्हीड हॉटेलचे पार्किंग आणि वरचा मजला रिकामा करण्यात आला आहे. या हॉटेलचे अध्यक्ष मालकल फेडरमन देखिल मोदींची भेट घेणार आहेत. फेडरमन हे संरक्षण इलेक्ट्रीक कंपनी एल्बिट सिस्टमचे अध्यक्ष आहेत. ही  या कंपनीचेही भारताशी व्यापारी संबंध आहेत.
 भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये शेती, पशुपालन, संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रांमध्ये व्यापारी संबंध आहेत. मौल्यवान खडे, तंत्रज्ञान, रसायने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, प्लास्टीक, खते, कपडे, औषधे अशा अनेक वस्तूंची आयात निर्यात हे देश करत असतात. या दोन्ही देशांनी २०१४ साली ४.५२ अब्ज डॉलर्सचा व्यापार (संरक्षण क्षेत्रातील खरेदी-विक्री वगळून) केला आहे. इस्रायलमध्ये तयार होणारे संरक्षण साहित्य खरेदी करणारा भारत हा सर्वात मोठा देश आहे.
 
 भारत आणि इस्रायल यांचे संबंध आज इतक्या वेगाने सुधारत असले तरी हा वेग गेल्या 70 वर्षांमध्ये कायम नव्हता. 1947 साली पॅलेस्टाइनचे विभाजन करण्याविरोधात भारताने संयुक्त राष्ट्रामध्ये मत दिले होते. त्याचप्रमाणे इस्रायलच्या यूएनमधील प्रवेशासही भारताने 1949 साली विरोध केला होता. 1950 साली भारताने इस्रायलला कायदेशीर मान्यता दिली. याबाबत बोलताना भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरु म्हणाले होते, ही मान्यता आम्ही यापुर्वीच देऊ शकलो असतो, पण मध्यपुर्वेतील आमच्या अरब मित्रांना न दुखावण्याची आमची इच्छा होती. 1953 साली इस्रायलला मुंबईत वाणिज्य दुतावास उघडण्याची परवानगी मिळाली. 1950 ते 1990 या काळात भारत आणि इस्रायल यांचे संबंध अनौपचारिक स्वरुपाचे राहिले. अर्थात या काळामध्ये विविध आंतरराष्ट्रीय व्यासपिठांवर दोन्ही देशांचे नेते भेटत होतेच. 1992 साली दोन्ही देशांनी मुत्सद्दी पातळीवरचे संबंध प्रस्थापित केले. पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन भारतात आले, त्यानंतर हे संबंध अधिक वाढीस लागले. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीने ते सर्वाधीक चांगल्या स्थितीत आहेत असे म्हणावे लागेल.
 
भारत-इस्रायल यांच्यांमधील राजनैतिक संबंध-
 
1992 - दोन्ही देशांमध्ये मुत्सद्दी पातळीवर संबंध प्रस्थापित
 
1997- इस्रायलचे राष्ट्रपती एझर वाइझमन यांची भारताला भेट
 
2000- उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी आणि परराष्ट्रमंत्री जसवंत सिंह यांची इस्रायलला भेट
 
2003- इस्रायलचे पंतप्रधान अरायल शेरॉन यांची भारतास भेट
 
2006- तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार, कपिल सिब्बल, कमलनाथ यांची  इस्रायल भेट
 
2012- परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची इस्रायलला भेट
 
2014- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेत्यानाहू यांची न्यू यॉर्कमध्ये भेट. 
 
2014- ट्वीटरवर नरेंद्र मोदी यांनी हिब्रूमधून हनुक्का या ज्यू सणाच्या शुभेच्छा दिल्या, त्याला नेत्यानाहूंचा हिंदीतून प्रतिसाद
 
2014- गृहमंत्री राजनाथ सिंह यांची इस्रायलला भेट
 
2015- इस्रायलचे परराष्ट्रमंत्री मोशे यालोन यांची भारत भेट (पंतप्रधानांशीही संवाद)
 
2015- भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची पॅलेस्टाइन आणि इस्रायलला भेट. इस्रायलची संसद नेसेटमध्ये भाषण. असे भाषण देणारे व इस्रायलला भेट देणारे पहिले भारतीय राष्ट्रपती
 
2016 - जानेवारी महिन्यामध्ये भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी इस्रायलला भेट दिली. यावेळेस इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्याशी चर्चा केली.
 
2016- नोव्हेंबर महिन्यामध्ये इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष रियुविन रिवलिन यांनी भारताला भेट दिली. यावेळेस त्यांनी मुंबईत खाबाद हाऊसलाही भेट दिली.