शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

मध्यमवर्गीय, शेतकर्‍यांकडून अर्थसंकल्पाचे स्वागत

By admin | Updated: February 29, 2016 22:02 IST

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

जळगाव- मध्यवर्गीय, शेतकर्‍यांनी बजेटचे स्वागत केले आहे. सिंचनासाठी केलेली तरतूद मात्र पुरेशी नाही. शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे प्रयत्न करताना मूलभूत सुविधांबाबत हात आखडता घ्यायला नको, असेही शेतकरी, मध्यवर्गीयांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

उत्पन्न दुप्पट
शेतकर्‍यांचे उत्पन्न पाच वर्षात दुप्पट करण्याचे उद्दीष्ट या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केंद्राने ठेवले आहे. शेतकर्‍यांचा विचार या अर्थसंकल्पात झाल्याचे यावरून दिसते. परंतु उत्पन्न दुप्पट करीत असताना खर्च मात्र आज आहे तसाच राहावा. नाही तर उत्पादन खर्चामधील वाढ ही डोकेदुखी कायम राहील. खते, बियाण्यासंबंधी स्पष्ट धोरण दिसत नाही.
कडूजी पाटील, जिल्हाध्यक्ष, शेतकरी संघटना

सिंचनावर तरतूद कमी
सिंचनावर सरकार वर्षभरात १७ हजार कोटी उपलब्ध करून देणार आहे. आपल्याकडी महाकाय प्रकल्प किंवा यासारखे प्रकल्प सात ते आठ हजार कोटींचे आहेत. अशी तोकडी तरतूद असली तर प्रकल्प वर्षभरात, दोन, चार वर्षात कसे पूर्ण होतील हा प्रश्न आहे.
-हर्षल चौधरी, शेतकरी

महागाई वाढतील
शासनाने इंधनाच्या करात वाढ केलेली असल्याने पुढील काळात इंधन स्वस्त झाले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ महिला, गृहीणींना होणार नाही. भाज्या, कांदे यांचे दर कमी ठेवण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागेल. असे दिसते. याशिवाय सर्वसामान्यांचा इंधनावरील खर्चही आहे तसाच रहील, असे वाटते.
-अर्चना महाजन, गृहीणी

शिक्षणाला प्रोत्साहन
अर्थसंकल्पात चैनीच्या वस्तू महाग करुन ग्रामीण भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. करातील स्लॅबमध्येही फारसे बदल नाहीत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा लाभ होईल. अपंग विद्यार्थ्यांचाही विचार झाला आहे. डिजीटल शिक्षणावरही लक्ष केंद्रीत केल्याने फायदा होईल.
प्राचार्य डॉ.उदय कुलकर्णी, मु.जे.महाविद्यालय

उच्चशिक्षण परवडणारे
सरकारने केलेल्या तरतुदीमुळे उच्चशिक्षण थोडे स्वस्त होऊ शकेल. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी योजना जाहीर झाली आहे. सेवा करात मात्र ०.५ टक्के वाढ केलेली असल्याने त्याचा काहीसा परिणाम या क्षेत्रावरही होऊशकतो.-प्राचार्यडॉ.एल.पी.देशमुख,नूतनमराठामहाविद्यालय



अनेक गोष्टी योग्य
चैनीच्या वस्तू महागणार असल्याचे अर्थसंकल्पातून सांगितले गेले आहे. हा निर्णय योग्य आहे. तसेच ५० लाखांचे खर खरेदीसाठी सवलत मिळणार आहे. ही सवलत नेमकी कशी मिळेल हे स्पष्टपणे पुढे यायला हवे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना व्हावा.
-नीलिमा जोशी, गृहीणी