शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नापूर्वी नववधूने घातली अजब अट, ऐकून थक्क झाले सासरचे!

By admin | Updated: January 6, 2017 18:23 IST

लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात.

ऑनलाइन लोकमत
भोपाळ, दि. 6 - लग्नापूर्वी सर्वसाधारणपणे नवरा मुलगा आणि  त्याच्या घरची मंडळी वधुपक्षासमोर मागण्या आणि अटी घालत असतात. पण मध्य प्रदेशातील भिंड येथील किसीपुरा गावात अशी घटना घडली आहे. जी ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.  या गावात राहणाऱ्या प्रियांका भदोरिया या तरुणीने आपल्या लग्नापूर्वी सासरच्या मंडळींसमोर अशी अट घातली ज्याची चर्चा सध्या होत आहे. 
त्याचे झाले असे की, सासरची मंडळी जोपर्यंत दहा हजार झाडे लावत नाहीत तोपर्यंत मी लग्न करणार नाही अशी अजब अट सासरच्या मंडळींसमोर घालली. प्रियांकाची ही अट ऐकून सासरच्यांना ही बाब थोडी विचित्रच वाटली, पण त्यांनी होणाऱ्या सुनबाईंची ही अट मान्य  केली. त्यानंतर प्रियांकाचे धुमधडाक्यात लग्न लावून देण्यात आले. यासंदर्भातील वृत्त न्यूज 24 या संकेतस्थळावर प्रकाशित झाले आहे. 
 या भागातील प्रथेनुसार लग्नापूर्वी सासरच्यांकडून नववधूला काय हवे हे विचारले जाते. बहुतांश मुली कपडे,  दागदागिन्यांची मागणी करतात. पण प्रियांकाने मात्र यापैकी काहीच न मागता दहा हजार झाडे लावण्याची  मागणी केली.  प्रियांकाला लहानपणापासूनच वृक्षारोपनाची आवड असल्याने तिने अशी मागणी केली. या दहा हजार झाडांपैकी पाच हजार झाडे माहेरी तर पाच हजार झाले सासरी लावण्यात यावीत, अशी तिची इच्छा आहे. देशात वारंवार उद्भवणारी दुष्काळी परिस्थिती पाहता प्रियांकाने केलेल्या या मागणीसारख्या प्रयत्नांची देशाला गरज आहे.