शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

विवाह समारंभ संकटात

By admin | Updated: November 13, 2016 03:25 IST

मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच

ग्रामीण भाग नोटांविना लोकांची ससेहोलपट

डुडको : मोदी सरकारने हजार-पाचशेच्या नोटांवर बंदी घातल्यामुळे ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहार पूर्णत: ठप्प झाले आहेत. लोकांकडे जेवणासाठीही पैसे नाहीत. कोणी आजारी पडलेच तर रुग्णालयात जाणेही कठीण झाले आहे. अनेक गावांत विवाह समारंभही थांबले आहेत. राजधानी दिल्लीपासून सुमारे ७५ कि.मी. अंतरावर असलेले डुडको गाव हे याचे एक उत्तम उदाहरण ठरावे. ग्रामीण भागातील सर्व आर्थिक व्यवहार रोखीनेच होतात. फारच थोड्या लोकांची बँकेत खाती आहेत. खाती असणारेही क्वचितच बँकांमार्फत व्यवहार करतात. रोखीच्या व्यवहारासाठी नोटाच नसल्यामुळे लोकांवर आर्थिक संकट कोसळले आहे. डुडकोमध्ये एकच बँक आहे. या बँकेबाहेर गावकऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे. त्यात महिलांचा समावेश अधिक आहे. बँकेत नोटा आल्याचे कळताच लोक उतावीळ झाल्याचे दिसून येते. नोटा लवकरच संपून जातात. सुनीता नावाच्या महिलेने सांगितले की, माझ्या मुलीचे येत्या १६ तारखेला लग्न आहे. लग्न सुखरूप पार पडेल की नाही, याची आम्हाला खात्री वाटत नाही. सोमवारी पैसे देतो असे बँक अधिकारी म्हणत आहेत. इतक्या कमी वेळात आम्ही तयारी कशी करणार?रोखीच्या समस्या असल्या तरी डुडकोतील गावकरी नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत! प्रल्हाद सिंग नावाच्या एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, सरकारचा निर्णय चांगला आहे. आम्हाला एवढीच चिंता आहे की, ही समस्या अजून किती दिवस चालेल. चांद सिंग नावाच्या माजी सरपंचाने सांगितले की, नोटांची टंचाई ही छोटी समस्या आहे. ती लवकरच दूर होईल, असे वाटते. (वृत्तसंस्था)