शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही येथून जाणार नाही

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

गंगाजमुनातील वारांगनांचा इशारा : पोलीस कारवाईच्या धाडसत्राने वारांगना दहशतीत

निलंगा : शहरातील प्राध्यापक वसाहत विद्यानगरात बिअरबार सुरु करण्यास नगरपालिकेने नाहरकत प्रमाणपत्र द्यावे, असा काही नगरसेवकांनी ठराव मांडला होता़ हा ठराव मंजूरही झाल्याने शंभर महिलांनी त्यास विरोध दर्शवित जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली़ महिलांचा हा पावित्रा पाहून ठराव मांडणार्‍या नगरसेवकांनी कोलांटउडी घेत आम्ही हा ठरावच मांडला नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न सुरु केला आहे़ त्यामुळे शहरात या नगरसेवकांची जोरदार चर्चा सुरु आहे़
शहरातील बसस्थानकाशेजारी प्राध्यापक वसाहत, विद्यानगर आहे़ या नगरात बिअरबार सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात यावी, अशी मागणी एका महिलेने केली होती़ नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत काही नगरसेवकांनी हा ठराव मांडला़ तेव्हा नगरसेविका वसुंधरा शिंगाडे यांनी त्यावर हरकत घेत परवानगी देण्यात येऊ नये अशी मागणी केली़ परंतु, नगरपालिकेने या हरकतीस केराची टोपली दाखवत १६ ऑक्टोबर २०१४ रोजी परवानगी दिली़
आपल्या वस्तीत बिअरबार होणार असल्याची माहिती नागरिकांनी मिळाल्याने विद्यानगरातील १०० महिलांनी बुधवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली आणि नगरपालिकेने दिलेले नाहरकत प्रमाणपत्र रद्द करावे, अशी मागणी केली आहे़ या निवेदनावर विना चोपणे, सुवर्णा सोळुंके, जनाबाई शिंदे, विजया वाडीकर, प्रणिता जाधव, प्रियंका जाधव, शोभा नितनवरे, प्रियंका धूत, शालिनी कुलकर्णी, कमल तुगावे, वनमाला जाधव, सविता वागदरे, राधा नितनवरे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत़
चौकट़़़
बुधवारी महिलांनी विरोध दर्शवित जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांकडे धाव घेतली़ दरम्यान, बियरबारला नाहरकत प्रमाणपत्र द्यावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या नगरसेवकांनी गुरुवारी मुख्याधिकार्‍यांना पत्र देऊन मी हा ठराव मांडला नाही़ माझ्या नावाचा वापर करुन षडयंत्र रचण्यात येत असल्याचे या नगरसेवकांनी म्हटले आहे़ आमचा या बिअरबारला आणि परमीट रुमला विरोध असल्याचेही स्पष्ट केले आहे़