शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

‘गोरक्षकांना धडा शिकवण्यासाठी हाती शस्त्रे घेऊ’

By admin | Updated: July 2, 2017 00:58 IST

स्वयंघोषित गोरक्षकांकडून गुरुवारी मुस्लीम व्यापाऱ्याची मारहाणीत हत्या केल्यानंतर येथील मुस्लीम महिलांनी गोरक्षकांना हाती

मनुवा (रामगढ-झारखंड) : स्वयंघोषित गोरक्षकांकडून गुरुवारी मुस्लीम व्यापाऱ्याची मारहाणीत हत्या केल्यानंतर येथील मुस्लीम महिलांनी गोरक्षकांना हाती शस्त्रे घेऊन धडा शिकवण्याची धमकी दिली आहे.मुस्लीम व्यापारी अलिमुद्दीन उर्फ असगर अली यांचा जवळपास १०० जणांच्या जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू झाला. अलिमुद्दीन गायीच्या मांसाची वाहतूक करीत असल्याचा या जमावाचा संशय होता. जमावाने त्यांची कारही पेटवून दिली. पोलिसांच्या वर्तनाने संतापलेल्या महिलांचा आता पोलिसांवरही विश्वास राहिलेला नाही. सरकारच या गोरक्षकांच्या कृत्यांत सहभागी असल्याची त्यांची भावना आहे. जमावाच्या कृत्याला जमावाद्वारेच उत्तर दिले जाईल, असे अलिमुद्दीन यांची पत्नी मरीयम खातून म्हणाल्या. गोरक्षकांना उत्तर देण्याबद्दल अनेक महिला मरीयम यांच्याशी सहमत आहेत. तर ममिना खातून म्हणाल्या की, आम्ही बायका आमचे पती घरी परत येतील की नाही या विचारांनी सतत भयभीत असतो. सरकार जर काही कृती करणार नसेल तर आम्ही आमच्या माणसांच्या संरक्षणासाठी हाती शस्त्रे घेऊ.  अधिकाऱ्यांच्या विरोधात येथे स्पष्ट संताप दिसत होता. आमच्या खाण्यापिण्याच्या सवयी काय आहेत, यात ठरावीक समाजाला काय गोडी आहे? आम्ही त्यांच्या स्वयंपाकघरात डोकावतो का? असे अबिदा खातून म्हणाल्या. आम्ही शांततेने जगणारे लोक आहोत. एखादी घटना आम्हाला शस्त्र हाती घेण्यास चिथावणी देणार नाही, असे भोला खान म्हणाले. प्रशासन आणि ग्रामस्थांमध्ये खान यांनी मध्यस्थ म्हणून काम केले.