शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

"मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू", सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तर

By admin | Updated: June 8, 2017 14:56 IST

एका व्यक्तीने सुषमा स्वराजांना आपण मंगळवार फसलो असल्याचं ट्विट करत पाय खेचण्याचा प्रयत्न केला

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज नेहमी ट्विटरवर सक्रिय असतात. ट्विटरच्या माध्यमातूनच अनेकजण त्यांच्यासमोर आपली समस्या मांडत असतात. सुषमा स्वराजदेखील तात्काळ त्यावर कारवाई, उपाययोजना करत मदतीसाठी धाव घेत असतात. विशेष म्हणजे सुषमा स्वराज स्वत: तक्रारीची दखल घेत उत्तर देत असतात. मात्र अनेकजण त्यांच्या या चांगल्या वृत्तीचा फायदा घेत खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करतात. अशाच प्रकारे खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करणा-या एका व्यक्तीला सुषमा  स्वराजांनी मिश्कीलपणे उत्तर देत त्यालाच तोंडघशी पाडलं. 
 
एका व्यक्तीने सुषमा स्वराजांना आपण मंगळवार फसलो असल्याचं ट्विट करत पाय खेचण्याचा प्रयत्न केला. आपण मंगळवार फसलो असून मंगळयान - 2 केव्हा पाठवण्यात येणार आहे ? असं ट्विट त्याने केलं होतं. आपली खिल्ली उडवण्याचा प्रयत्न होत असल्याचं लक्षात येताच सुषमा स्वराज यांनी संतापण्याऐवजी मिश्कीलपणे उत्तर देत सांगितलं की, तुम्ही मंगळावर जरी असलात तरीही भारतीय दूतावास तुमच्या मदतीसाठी धावून येईल. 
 
अमेरिकेतील शिकागोत राहणा-या करण सैनी याने ट्विट केलं होतं की, "सुषमा स्वराज, मी मंगळावर फसलो आहे, 987 दिवसांपुर्वी मंगळयानातून जेवण पाठवण्यात आलं होतं जे संपलं आहे. मंगळयान 2 कधी पाठवण्यात येईल ?". करण सैनीने आपल्या या ट्विटमध्ये इस्त्रोलाही टॅग केलं होतं. 
 
यावर सुषमा स्वराज यांनी उत्तर दिलं की, "तुम्ही मंगळावर जरी फसला असाल, तरीदेखील भारतीय दूतावास तुमची मद करेल". सुषमा स्वराज यांच्या उत्तरामुळे नेमकी फजिती कोणाची झाली हा विचार करण सैनी करत असेल.