शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

आम्ही एकाच सायकलची दोन चाके - अखिलेश

By admin | Updated: January 29, 2017 15:49 IST

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव

ऑनलाइन लोकमत
 लखनौ, दि. 29 -  उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी आणि काँग्रेसमध्ये आघाडी झाल्यानंतर आज प्रथमच काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश  यादव प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी एकमेकांवर स्तुतिसुमने उधळताना परस्परांची मुक्तकंठाने प्रशंसा केली एका बाजूला राहुल गांधी यांनी अखिलेश यांच्याशी असलेल्या व्यक्तिगत संबंधांचा हवाला दिला. तर दुसरीकडे अखिलेश यांनी आपण आणि राहुल एकाच सायकलची दोन चाके असल्याचे सांगितले.  
या संयुक्त पत्रकार परिषदेदरम्यान, दोन्ही पक्षांचे प्रचार गीत "यूपी को यह साथ पसंद है'  प्रसिद्घ करण्यात आले. यावेळी काँग्रेस आणि सपाची आघाडी म्हणजे गंगा आणि यमुनेचा संगम असल्याचे राहुल गांधी यांनी  सांगितले. तसेच द्वेशाच्या राजकारणाला प्रत्युत्तर देण्यासाठी ही आघाडी केल्याचे ते म्हणाले.  या परिषदेत दोघांचाही रोख मायावती यांच्यापेक्षा मोदींवरच अधिक असल्याचे दिसून आले.
 राहुल म्हणाले, "द्वेशाच्या राजकारणामुळे देशाचे नुकसान झाले आहे. पण उत्तर प्रदेशच्या डीएनएमध्ये प्रेम आणि बंधुभाव आहे.  द्वेश नाही. आता उत्तर प्रदेशच्या तरुणांना आम्ही नवा रस्ता दाखवू इच्छितोय. नव्या प्रकारचे राजकारण देऊ इच्छित आहोत. आम्ही वैचारिक समानतेच्या मुद्यावर एकत्र येऊन निवडणूक लढवत आहोत."
 तर अखिलेश यांनीही राहुल यांची प्रशंसा केली. "राहुल आणि  मी एकाच सायकलची दोन चाके आहोत. हात आणि सायकल एकत्र असतील तर वेग वाढणारच,  आता उत्तर प्रदेश देशाला रस्ता दाखवतो आणि आम्ही या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ," असे अखिलेश   यांनी सांगितले. 
 
This alliance isn't opportunistic,will explain to Modi Ji,BJP & RSS that UP and its people are one and we will not let them create divide:RG pic.twitter.com/9bH84ed0Wh