शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागरिक म्हणतात आम्ही आव्हाणेकर की जळगावकर...

By admin | Updated: March 14, 2016 00:20 IST

शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.

शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक अशा शासकीय नोकरांची ही वस्ती आहे. ज्यांनी गृहनिर्माण सोसायटी स्थापन केली ते गायब आहेत. पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने लांबवरून पाणी आणावे लागते.
बबिता सुभाष मोरे, राजाराम नगर

........................
या भागात पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नाही. रोज दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणणे शक्य नसल्याने बोरींगचे पाणी पिण्यास सुरुवात केली आहे. वस्ती वाढत असल्याने बोरींगचे पाणी देखील पुरत नाही. पाण्याच्या सोयीसाठी आम्ही २५ हजार रुपये जादा मोजले आहे. मात्र आजपर्यंत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून दिलेली नाही.
विद्या सुरेश मोहता, राजाराम नगर
...................................................
आमचे घर हे आव्हाणे ग्रामपंचायत हद्दीत येते. मात्र आमचा सर्व व्यवहार हा जळगाव शहराशी संबधित आहे. त्यामुळे आम्ही आव्हाणेकर आहोत की जळगावकर हा प्रश्न आहे. ग्रामपंचायत असो की महापालिका आम्ही कर भरण्यासाठी तयार आहोत. मात्र आम्हाला पिण्याचे पाणी, वीज, गटारी या मुलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
कल्पना मधुकर बाविस्कर, राजाराम नगर
.............................................
पिण्याच्या पाण्याची या ठिकाणी स्वतंत्र व्यवस्था नसल्याने आम्हाला रेल्वे स्टेशन, शिवाजी नगर भागातून पाणी आणावे लागते. सकाळ व संध्याकाळी पिण्याचे पाणी आणण्याचा रोजचा दिनक्रम आहे. वाघ नगरच्या धर्तीवर राजाराम नगरात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था महापालिकेने करून द्यावी.
लखिचंद प्रकाश पाटील.
...............................................
तीन गृहनिर्माण सोसायटी स्थापन केल्यानंतर पदाधिकारी गायब आहेत. फोन लावावे तर फोन लागत नाही. उतारे सोसायटीच्या नावाने असल्याने वीज मीटर किंवा पिण्याचे पाण्याची मनपा किंवा ग्रामपंचायतीकडे मागणी केली जाते त्यावेळी अडचणी येत असतात.
नीलेश सिद्धार्थ इंगळे.