शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

चीन व पाकविरुद्ध लढण्यास आम्ही तयार

By admin | Updated: June 30, 2017 02:10 IST

चीन व पाकिस्तानच्या तसेच अंतर्गत धोक्याविरुद्ध लढायला भारतीय लष्कर तयार आहे, असे संकेत देणारे उद्गार लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी काढले.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : चीन व पाकिस्तानच्या तसेच अंतर्गत धोक्याविरुद्ध लढायला भारतीय लष्कर तयार आहे, असे संकेत देणारे उद्गार लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी काढले. लष्करप्रमुख रावत आज सिक्कीमच्या दौऱ्यावर होते. सिक्कीमच्या सीमावर्ती भागात दोन दिवसांपूर्वी चीनच्या लष्कराने घुसखोरी केली. त्या पार्श्वभूमीवर जनरल रावत यांनी वृत्तवाहिनीशी बोलताना हे उद्गार काढले.त्यांच्या वक्तव्यामुळे संतापलेल्या चीनने इतिहासापासून (१९६२ च्या युद्धापासून) धडा घ्या, अशी गर्भित धमकी लष्करप्रमुखांना दिली आहे. अशी भडक विधाने करू नका, असे सांगतानाच चीनच्या प्रवक्त्याने जनरल रावत यांचे वक्तव्य अतिशय बेजबाबदार आहे, अशी टीका केली आहे. चीन व पाकिस्तान यांचा थेट उल्लेख न करता लष्करप्रमुख म्हणाले की, दोन्ही आघाड्यांवर लढायला आमची तयारी आहे. राजकीय नेतृत्व जसे सांगेल, तसे करण्यास आम्ही सज्ज आहोत. तशी क्षमता आमच्यामध्ये आहे. उत्तरेकडील सीमेवर व नियंत्रण रेषेवर संबंध चांगले राहण्यास लष्कराची कायमच तयारी असते. (सिक्कीमचा) तो भाग आमचाच असून, भारतानेच तेथे घुसखोरी केली आहे, असे चीनने म्हटले होते. चीनने त्या भागात रस्तेबांधणीही केली आहे. तो भाग भारत-चीन व भूतान यांच्या सीमेवर असला तरी तो भारताचे अविभाज्य अंग आहे, अशी भारताची भूमिका आहे. भूताननेही आमच्या भागात चीनने रस्तेबांधणी सुरू केल्याचा आरोप केला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.