शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही इथे भंगार गोळा करायला बसलो नाही - सुप्रीम कोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 03:15 IST

नवी दिल्ली : आम्ही येथे भंगार गोळा करायला बसलेलो नाही. जो मिळेल तो कचरा जसाच्या तसा आमच्यासमोर आणून टाकू नका, अशा कडक शब्दांत खरडपट्टी काढत, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे ८४५ पानी प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास नकार दिला.

ठळक मुद्देकेंद्र सरकारला फटकारले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आम्ही येथे भंगार गोळा करायला बसलेलो नाही. जो मिळेल तो कचरा जसाच्या तसा आमच्यासमोर आणून टाकू नका, अशा कडक शब्दांत खरडपट्टी काढत, सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारचे ८४५ पानी प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यास नकार दिला.पाच खासगी इस्पितळांनी उपचारांस नकार दिल्याने सात वर्षे वयाच्या एका मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याच्या बातमीची दखल घेऊन न्यायालयाने देशभरातील घनकचरा व्यवस्थापनाचा विषय जनहित याचिका म्हणून हाती घेतला आहे. डेंग्यू व चिकनगुन्या हे डासांमुळे होतात व कचर्‍यांचे ढीग वेळीच उचलले न गेल्याने डासांची पैदास होते, हे सर्वज्ञात आहे. म्हणूनच घनकचरा व्यवस्थापनाच्या सन २0१६ मध्ये तयार केलेल्या नियमावलीची कशी व किती अंमलबजावणी होत आहे, याची माहिती सर्व राज्यांमधून घेऊन ती सादर करण्यास न्यायालयाने केंद्र सरकारला डिसेंबरमध्ये सांगितले होते.न्या. मदन  लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण आले, तेव्हा केंदाच्या वकिलाने सांगितले की, २२ राज्यांकडून जी काही माहिती मिळाली आहे त्याआधारे आम्ही ८४५ पानांचे प्रतिज्ञापत्र तयार केले आहे. ते दिवसभरात दाखल केले जाईल. न्यायालयाने त्याबाबत काही प्रश्न विचारले असता, त्याची उत्तरेही वकिलास देता आली नाहीत.त्यामुळे संतापून न्यायाधीश केंद्राच्या वकिलांना म्हणाले की, हे असे गलेलठ्ठ प्रतिज्ञापत्र केले की आम्ही प्रभावित होऊ, असे वाटत असेल तर ते डोक्यातून काढून टाका. जे काही हाताशी मिळेल ते आमच्यासमोर टाकू नका. जे तुम्ही स्वत: वाचले नाही ते आम्ही वाचावे, अशी तुमची अपेक्षा आहे. आम्ही तुमचे हे प्रतिज्ञापत्र स्वीकारणार नाही. सर्व माहिती घ्या. तिचे नीट संकलन करा आणि ती सुस्पष्ट तक्त्याच्या स्वरूपात सादर करा, त्यासाठी तीन आठवड्यांची वेळ देत आहोत.न्यायालयास जी माहिती हवी आहे, त्यात २0१६ चया नियमावलीनुसार कोणकोणत्या राज्यांनी व केंद्रशासित प्रदेशांनी घनकचरा व्यवस्थापन सल्लागार मंडळे स्थापन केली आहेत, स्थापनेची तारीख, सदस्यांची नावे व तपशील आदी माहितीचा समावेश आहे. राज्ये नियमांचे पालन करतात की नाही यावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी असलेल्या केंद्रातील मंत्रालयांनी काय केले, याचीही माहिती त्यात द्यायची आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय