गुरुवारी पाणीकपात
By admin | Updated: August 3, 2015 22:26 IST
गुरुवारी पाणीकपात
गुरुवारी पाणीकपात
गुरुवारी पाणीकपातमुंबई : महापालिकेच्या वतीने शिवडीमधील रफी अहमद किडवाई मार्गावरील १४५० व्यासाच्या जलवाहिनीवर झडप बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सुरु होणारे हे काम ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता पुर्ण होईल. त्यामुळे या कालावधीत शीव, माटुंगा, दादर, पारशी कॉलनी, हिंदू वसाहत, दादर टी.टी., मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय मार्ग, कात्रक मार्ग, आर. ए. किडवाई मार्ग, सहकार नगर महापालिका वसाहत व कोरबा मिठागार येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहील.दादर, नायगांव, परळ, लालबाग, चिंचपोकळी, एस. एस. राव मार्ग, शिवडी पूर्व व पिम परिसर, ज्ञानेश्वर नगर, शिवडी महापालिका क्षयरोग रुग्णालय, अभ्युदय नगर येथील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच उर्वरित भागात परळ व्हिलेज, आंबेवाडी, काळेवाडी परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी या परिसरातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून अगोदरच्या दिवशीच पुरेसा पाणीसाठा करावा आणि काटकसरीने पाण्याचा उपयोग करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. (प्रतिनिधी)