शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मांजरा धरणातील पाणी उपसा एक दिवसासाठी बंद नव्या पंपाची चाचणी : आठवड्यातून दोन वेळा पाणी

By admin | Updated: January 31, 2017 02:06 IST

लातूर : मांजरा धरणावरील रोहित्र बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या पंपाची चाचणी घेण्यासाठी आज पाणीउपसा बंद राहणार आहे़ सोमवारी दिवसभर चाचणी घेतल्यानंतर दोन पंपाद्वारे लातूरसाठी पाणी उचलण्यात येणार आहे़ आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यासाठी हे पंप चालू करण्यात येत आहेत़

लातूर : मांजरा धरणावरील रोहित्र बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या पंपाची चाचणी घेण्यासाठी आज पाणीउपसा बंद राहणार आहे़ सोमवारी दिवसभर चाचणी घेतल्यानंतर दोन पंपाद्वारे लातूरसाठी पाणी उचलण्यात येणार आहे़ आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यासाठी हे पंप चालू करण्यात येत आहेत़
२० जानेवारी पासून आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचे नियोजन मनपाने केले होते़ मात्र मांजरा प्रकल्पावर असलेल्या रोहित्राची चोरी झाली होती़ त्यामुळे नवे रोहित्र बसविण्याचे काम वेळेत होऊ शकले नाही़ परिणामी,आठवड्याला दोन वेळा पाणी देण्याचे नियोजन कोलमडले होते़ आता रोहित्र बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन पंपाद्वारे पाणी उपसा होणार आहे़ त्याच्या चाचणीसाठी सोमवारी दोन्हीही पंप बंद ठेवले जाणार आहेत़ तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर ५० ते ५५ एमएलडी दररोज पाणी मांजरा प्रकल्पातून उचलले जाणार आहे़ मांजरा प्रकल्पातील ५० एमएलडी आणि साई, नागझरी येथील २० एमएलडी, असे एकूण ७० एमएलडी दररोज पाणी उचलून ४ दिवसाआड लातूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ त्याचे वेळापत्रक तयार आहे़ परंतु, हे वेळापत्रक जाहीर न करता आठवड्याला दोन वेळा पाणी देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ मंगळवारपासून होणार आहे़
मांजरा प्रकल्पावर रोहित्र आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे़ त्यामुळे दोन्हीही पंप सुरू राहतील़ तांत्रिक तज्ञांमार्फत या पंपाची चाचणी घेण्याला सोमवारीच प्रारंभ होणार आहे़ एकदा चाचणी झाल्यानंतर आणि आठवड्यात दोन वेळा पाणी देण्याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल़ त्या वेळापत्रकानुसार पाण्याचे वितरण होईल, असे मनपातून सांगण्यात आले़