शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

आज दुपारनंतर होणार पाणीपुरवठा अखेर दुरुस्ती पूर्ण : शुक्रवारी उशीरा झाला पाणीपुरवठा; नागरिकांचे प्रचंड हाल

By admin | Updated: March 11, 2016 22:24 IST

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.

मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवार, ८ रोजी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होेते. गळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू राहणार होते. त्यामुळे ९ रोजीचा पाणीपुरवठा १० रोजी तर १० रोजीचा पाणीपुरवठा ११ रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले ह ोते. मात्र गळती दुरुस्ती ठरलेल्या वेळेत होऊनही तेथील व्हॉल्व खराब झाल्याने तो उघडूच शकला नाही. त्यामुळे तो व्हॉल्व अखेर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येऊन थेट पाईप जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर उमाळे येथील एमबीआरमधून पाणी सोडण्यात आले. ते पाणी गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दोन-अडीच तास लागले. त्यानंतर गिरणा टाकी भरण्यात आली. तसेच त्यावरून इतर टाक्या भरून पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ९ रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात ११ रोजी उशीराने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच १० रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात १२ रोजी दुपारी उशीराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थेकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष
वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम व्हॉल्वच्या बिघाडामुळे लांबल्याने ७ रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तर काही भागांमध्ये तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मनपा प्रशासनाने मात्र पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ आली आहे.