शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा विभागाला हवे अतिरिक्त मनुष्यबळ महापालिका : ४४० कर्मचार्‍यांची मागणी

By admin | Updated: July 13, 2015 16:07 IST

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा काळात साधुग्राम, वाहनतळे, भाविक मार्ग यांसह नाशिक शहराचा पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार आहे; परंतु अपुरे मनुष्यबळ असल्याने सिंहस्थपर्वकाळात नियोजन करताना पाणीपुरवठा विभागाची मोठी कसोटी लागणार आहे. विभागाने महापालिका आयुक्तांकडे अतिरिक्त तब्बल ४४० मनुष्यबळाची मागणी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळा पर्वकाळाला मंगळवार, दि. १४ जुलैपासून प्रारंभ होत आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने महापालिकेचा बांधकाम, पाणीपुरवठा, अग्निशमन, आरोग्य व वैद्यकीय विभाग आपल्या स्तरावर नियोजनात गुंतला असून, विभागांनी त्यांना हव्या असलेल्या अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी केली आहे. शासनानेही १४ जुलैच्या आत प्रतिनियुक्तीवर कर्मचारी उपलब्ध करून घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने शासनाच्या अन्य विभागांकडे मागणी नोंदविलेली आहे. सिंहस्थात पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवेची मोठी जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर असणार आहे. महापालिकेमार्फत तपोवनातील साधुग्राममध्ये पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात आलेली आहे. त्यासाठी स्वतंत्र तीन जलकंुभांची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय महापालिकेमार्फत पेठरोड, दिंडोरीरोड व आडगाव या तीन ठिकाणी बा‘ वाहनतळे उभारण्यात येत असून, त्याठिकाणी ४८ पीव्हीसी पाण्याच्या टाक्या आणि ३९२ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच महामार्ग बसस्थानक, सिन्नर फाटा मार्केट यार्ड, सातपूर बसस्थानक, निलगिरी बाग, पंचवटी स्टेडियम, पेठरोडवरील शरदश्चंद्र पवार मार्केट या अंतर्गत वाहनतळांवरही सुमारे ५२ पाण्याच्या टाक्या, तसेच २५८ स्टॅण्डपोस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भाविक मार्गांवरही पाणीपुरवठ्याची सोय राहणार आहे. या सर्व पाणीपुरवठ्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. त्यासाठी ४४० अतिरिक्त कर्मचार्‍यांची मागणी नोंदविण्यात आलेली आहे.