शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शहरात पाणी पुरवठ्याची बोंबाबोंब प्रशासन हतबल: कधी गळती तर कधी विजेची सबब, पाणी पुरवठा एक दिवस पुढे

By admin | Updated: December 12, 2015 18:34 IST

जळगाव : पाईप लाईनची वारंवार गळती तर कधी वीज पुरवठ्याचा व्यत्यय यामुळे शहरातील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तर शनिवारीही वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

जळगाव : पाईप लाईनची वारंवार गळती तर कधी वीज पुरवठ्याचा व्यत्यय यामुळे शहरातील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तर शनिवारीही वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने पाणी मागितले तरीही ते देण्याइतका पाणीसाठा वाघूर मध्ये असल्याचा दावा जिल्हाधिकार्‍यांनी केला होता. मात्र मनपाला वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे ते शक्य नसल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभाकडून स्पष्ट करण्यात आले होते.
वाघूर धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे जर मनपाने मागणी केली तर दररोजदेखील पाणीपुरवठा करण्याइतका पाणीसाठा उपलब्ध करून देऊ, असे विधान जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी पाणी आरक्षण आढावा बैठकीत केले होते. त्यामुळे याबाबत मनपाच्या संबंधित अधिकार्‍यांना याबाबत विचारणा केली असता दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाची वितरण व्यवस्था अपुरी आहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जास्तीत जास्त १ दिवसाआड पाणीपुरवठा करता येऊ शकतो. कारण मनपाच्या वाघूर योजनेच्या पंपांची क्षमता १०८ एमएलडी इतकी आहे. त्याद्वारे दररोज ८० एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. त्यातून दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले होते.
गळतीचे प्रकार झाले नित्त्याचे
गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठ्यात व्यत्यय आल्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे २५ नोव्हेंबरला मेहरूण परिसरात १२०० मीटर व्यासाच्या पाईप लाईनला गळती लागली होती. दोन दिवस हे कामकाज चालले. त्यानंतर २८,२९ ला शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर आठवडाभरातच म्हणजे ५ डिसेंबरला पुन्हा पाईप लाईनला गळती लागली. मेहरूण स्मशानभूमीलगत ही गळती लागली होती. त्यामुळे पाईप लाईन दुरुस्तीचे काम दोन दिवस सुरू होते. त्यामुळे सात डिसेंबरला पाणी पुरवठा सुरू झाला.